ऑस्ट्रेलियन ओपन : सहभागी खेळाडूंना व्हावे लागणार क्वारंटाईन 

सकाळ स्पोर्ट्स ऑनलाईन टीम
Sunday, 20 December 2020

टेनिस जगतातील पहिली ग्रँडस्लॅम म्हणून ओळखली जाणारी ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेची तारीख नुकतीच जाहीर करण्यात आली.

टेनिस जगतातील पहिली ग्रँडस्लॅम म्हणून ओळखली जाणारी ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेची तारीख नुकतीच जाहीर करण्यात आली. त्यानंतर या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंना कोरोनाच्या खबरदारीसाठी म्हणून 14 दिवस मेलबर्नमध्ये क्वारंटाईन रहावे लागणार आहे. नवीन वर्षात ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा 8 ते 21 फेब्रुवारी दरम्यान होणार आहे. 

ला लिगा : लिओनेल मेस्सीची दिग्गज फुटबॉलपटू पेले यांच्या विक्रमाशी बरोबरी  

ऑस्ट्रेलियाच्या व्हिक्टोरिया प्रशासनाने याबाबतची पुष्टी केली असून, सर्व खेळाडूंच्या सुरक्षिततेसाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच  व्हिक्टोरिया प्रशासनाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी आणि टेनिस ऑस्ट्रेलिया या योजनेत एकत्रितपणे काम करणार असल्याचे प्रशासनाकडून नमूद करण्यात आले आहे. 

पी व्ही सिंधूसाठी कायपण! 'साई'ने मंजूर केली तिची मागणी   

या स्पर्धेत सहभागी होणारे खेळाडू जानेवारीच्या मध्यापर्यंत स्पर्धेच्या ठिकाणी पोहचण्याची शक्यता आहे. त्यानंतर त्यांना दोन आठवड्यांसाठी क्वारंटाईन रहावे लागणार आहे. मात्र यावेळी त्यांना पाच तासांसाठी सराव करण्याची मुभा असणार आहे. याशिवाय ऑस्ट्रेलियात येण्यापूर्वी कोरोनाची चाचणी करणे अनिवार्य असणार आहे. आणि त्यानंतर मेलबर्न येथे दोन आठवड्यांमध्ये सर्व खेळाडूंची पाच वेळा कोरोना चाचणी करण्यात येत आहे. तसेच यादरम्यान कोणताही खेळाडू कोरोना बाधित आढळल्यास त्याला वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली आयसोलेशन मध्ये रहावे लागणार आहे.    


​ ​

संबंधित बातम्या