फ्रेंच ओपन जिंकण्याची शक्यताच नाही - फेडरर

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 20 May 2021

वर्षभर माझा खेळ चांगला झालेला नाही. या परिस्थितीत फ्रेंच स्पर्धेत विजेतेपद जिंकण्याचा विचारही करू शकत नाही, असे रॉजर फेडररने सांगितले. पुनरागमनानंतरच्या पहिल्याच सामन्यात पराजित झाल्यानंतर फेडररने हे मत व्यक्त केले.

जीनिव्हा - वर्षभर माझा खेळ चांगला झालेला नाही. या परिस्थितीत फ्रेंच स्पर्धेत विजेतेपद जिंकण्याचा विचारही करू शकत नाही, असे रॉजर फेडररने सांगितले. पुनरागमनानंतरच्या पहिल्याच सामन्यात पराजित झाल्यानंतर फेडररने हे मत व्यक्त केले.

फेडररची अँदुजार याच्याविरुद्ध ४-६, ६-४, ४-६ अशी हार झाली. या पराभवापेक्षाही फेडररला निर्णायक सेटमध्ये गमावलेली ४-२ आघाडी सलत असेल. तुम्ही फारसे खेळत नाही. त्याचबरोबर तुम्ही कुठल्या स्तरावर खेळत आहात हे माहिती असेल तर... तर हेच मी अनुभवले. या परिस्थितीत मी फ्रेंच स्पर्धा जिंकण्याचा विचारही कसा करू शकतो, असे फेडररने विचारले.


​ ​

संबंधित बातम्या