फ्रेंच टेनिस स्पर्धेत प्रेक्षकांना निगेटिव्ह अहवाल बंधनकारक

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 13 May 2021

टेनिस जगताला आता फ्रेंच ओपनचे वेध लागले आहे. कोरोनाचे संकट जगात असले, तरी ही स्पर्धा  ३० मे ते १३ जून या कालावधीत होणार आहे. मोजक्या प्रेक्षकांनाही स्टेडियमध्ये प्रवेश देण्यात येणार आहे; परंतु त्यासाठी त्यांना निगेटिव्ह अहवाल किंवा लसीकरणाचे प्रमाणपत्र बाळगणे आवश्यक आहे.

पॅरिस - टेनिस जगताला आता फ्रेंच ओपनचे वेध लागले आहे. कोरोनाचे संकट जगात असले, तरी ही स्पर्धा  ३० मे ते १३ जून या कालावधीत होणार आहे. मोजक्या प्रेक्षकांनाही स्टेडियमध्ये प्रवेश देण्यात येणार आहे; परंतु त्यासाठी त्यांना निगेटिव्ह अहवाल किंवा लसीकरणाचे प्रमाणपत्र बाळगणे आवश्यक आहे, असे रोलँड गॅरोस् संघटकांनी आज जाहीर केले.

फ्रेंच टेनिस फेडरेशनचे सरसंचालक अमेली औद्रेआ-कॅस्तेरा यांनी सांगितले की, सामने पाहण्यास स्टेडियममध्ये यायचे असल्याचे ४८ तासांपूर्वीचा पीसीआर किंवा अँटिजेन चाचणी निगेटिव्ह अहवाल किंवा लस घेतल्याचे प्रमाणपत्र प्रेक्षकांनी सादर करणे गरजचे आहे. ८ जूनपर्यंत दररोज ५,३८८ प्रेक्षकांना संधी दिली जाणार आहे. ९ जूननंतर ही संख्या १३,१४६ एवढी असेल. फ्रेंच सरकारने स्टेडियम क्षमतेच्या ६५ टक्के प्रेक्षकांना उपस्थितीची परवानगी दिली आहे.

फ्रान्समध्ये राष्ट्रीय स्तरावर सायंकाळी ७ ते सकाळी ६ पर्यंत संचारबंदी आहे. १९ मेपासून संचारबंदीचा कालावधी कमी करण्यात आला असून ती रात्री ९ पासून सुरू होणार आहे. याचा फायदा फ्रेंच टेनिसला होऊ शकेल.


​ ​

संबंधित बातम्या