ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये नाओमीचा 'ब्रँड', चौथ्यांदा कोरलं ग्रँडस्लॅमवर नाव

सकाळ स्पोर्ट्स ऑनलाईन टीम
Saturday, 20 February 2021

र्टवर तिला चांगलेच समर्थन मिळाले. सेरेना विल्यम्स सारख्या तगड्या आणि अनुभवी महिला टेनिस स्टारला पराभूत करुन फायनमध्ये पोहचल्यानंतर नाओमीच यंदाच्या वर्षातील पहिल्या ग्रँडस्लॅमची प्रमुख दावेदार असल्याचे मानले जात होते.

जपानची स्टार महिला टेनसिसपटू नाओमी ओसाकाने शनिवारी झालेल्या महिला एकेरीच्या फायनलमध्ये जेनिफर ब्रँडीला सरळ सेटमध्ये नमवत दुसऱ्यांदा ऑस्ट्रेलियन ओपनचे जेतेपद पटकावले. 23 वर्षीय नाओमीनं  जेनिफरला 6-4, 6-3 असे सरळ सेटमध्ये पराभूत केले. तिच्या करियरमधील हे चौथे ग्रँडस्लॅम ठरले. यापूर्वी 2018 मध्ये तिने ऑस्ट्रेलिया ओपनचे जेतेपद मिळवले होते.  

ऑस्ट्रेलियन ओपनच्या फायनलमधील कामगिरीनंतर तिने जागतिक महिला टेनिस क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे. कोर्टवर तिला चांगलेच समर्थन मिळाले. सेरेना विल्यम्स सारख्या तगड्या आणि अनुभवी महिला टेनिस स्टारला पराभूत करुन फायनमध्ये पोहचल्यानंतर नाओमीच यंदाच्या वर्षातील पहिल्या ग्रँडस्लॅमची प्रमुख दावेदार असल्याचे मानले जात होते. तिने ते खरं करुन दाखवलं. ग्रँडस्लॅमच्या क्वार्टरफायनलमध्ये पोहचल्यानंतर नाओमी कधीच पराभूत झालेले नाही.  

WTA 250 Phillip Island Trophy : डब्ल्यूटीए स्पर्धेत अंकिता प्रथमच विजेती

22 वर्षीय ब्रँडीने चेक प्रजासत्ताकच्या 25 व्या मानांकित कॅरोलिना मुचोवाला हिने तीन सेटमध्ये झालेल्या संघर्षमय लढतीत  6-4, 3-6, 6-4 असा पराभव करुन फायनल गाठली होती. ती पहिल्यांदाच फायनलमध्ये पोहचली होती .मागील वर्षी ओसाकानेच तिला अमेरिकन ओपनच्या सेमीफायनलमध्ये पराभूत केले होते. 


​ ​

संबंधित बातम्या