प्रत्येक सामन्यानंतर कोबे ब्रायंटची जर्सी का घातली? नाओमीने केला खुलासा

टीम ई-सकाळ
Sunday, 13 September 2020

अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेत जपानच्या नाओमी ओसाका हिने दुसऱ्यांदा महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले.

अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेत जपानच्या नाओमी ओसाका हिने दुसऱ्यांदा महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले. नाओमीने बेलारूसच्या व्हिक्टोरिया अझारेंका हिला अंतिम सामन्यात पराभूत केले. या विजयानंतर नाओमी ओसाकाने माजी बास्केटबॉलपटू कोबे ब्रायंटची जर्सी परिधान केली. तसेच जागतिक क्रमवारीत क्रमांक एकवर राहिलेल्या नाओमीचे हे तिसरे ग्रँड स्लॅम विजेतेपद आहे.  

कोरोनाशी लढा दिल्यानंतर ब्राझीलचा स्टार फुटबॉलपटू नेमार संघात परतला  

नाओमी ओसाकाने सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये मला त्या व्यक्तीसारखे बनायचे आहे ज्याच्याबद्दल मी विचार करते. व कोबे ब्रायंट नेहमीच एक महान खेळाडू राहिला. मला आशा आहे की भविष्यात मीसुद्धा त्याच्यासारखे होईन. प्रत्येक दिवशी माझ्या सामन्यानंतर मी त्याची जर्सी घातली. त्यामुळे मी नेहमीच असा विचार करते की त्यातून मला ताकद मिळत असल्याचे ओसाकाने सांगितले. 

दिग्गज बाक्सेटबॉलपटू कोबी ब्रायंट (वय 41) आणि त्याची 13 वर्षाची मुलगी गियाना यांचा यावर्षीच्या जानेवारी मध्ये हेलिकॉप्टरच्या दुर्घटनेत मृत्यू झाला होता. कोबी ब्रायंटने लॉस एंजलिस लेकर्सकडून खेळताना बास्केटबॉलच्या आपल्या 20 वर्षांच्या कारकीर्दीत पाच राष्ट्रीय बास्केटबॉल असोसिएशन (एनबीए) अजिंक्यपद जिंकले होते. याशिवाय बास्केटबॉलला अलविदा करताना कोबी ब्रायंटने लिहिलेल्या पत्राने ऑस्कर पुरस्कार पटकावला होता. कोबे ब्रायंटने 29 नोव्हेंबर 2015 ला निवृत्ती घेतल्यानंतर पत्र लिहिले होते. आणि त्यावरच 2017 मध्ये ॲनिमेटेड शॉर्ट फिल्मि चित्रित करण्यात आली होती. या शॉर्ट फिल्मला ऑस्कर पुरस्कार देण्यात आला होता.     

क्रिकेटबद्दल भज्जी करणार मोठा खुलासा ; ट्विट मधून दिले संकेत 

दरम्यान, महिला एकेरीचा अंतिम सामना युएसटीए बिली जिन्स किंग नॅशनल टेनिस सेंटरमध्ये झाला. यामध्ये 22 वर्षीय ओसाकाने पहिल्या सेट मधील पिछाडी पुढच्या दोन्ही सेटमध्ये भरून काढली. नाओमीने पहिला सेट 1-6 ने गमावला होता. त्यानंतर सलग दोन सेटमध्ये 6-3, 6-3 अशी कामगिरी करत अंतिम सामन्यात विजय मिळवला. अझारेंका तिसऱ्यांदा अमेरिकन ओपनच्या अंतिम सामन्यात पोहोचली पण पुन्हा तिच्या हाती निराशाच लागली. तर ओसाकाने याआधी 2018 मध्ये अमेरिकन ओपन आणि 2019 मध्ये ऑस्ट्रेलियन ओपनचे विजेतेपद पटकावले होते.  
 

 


​ ​

संबंधित बातम्या