नदालने गाठला हजार विजयांचा टप्पा

सकाळ वृत्तसेवा
Friday, 6 November 2020

राफेल नदालने व्यावसायिक टेनिस स्पर्धेत एक हजार विजयांचा टप्पा पार केला.

पॅरिस : राफेल नदालने व्यावसायिक टेनिस स्पर्धेत एक हजार विजयांचा टप्पा पार केला. पॅरिस मास्टर्समध्ये हा टप्पा गाठत नदाल ही कामगिरी करणारा चौथा टेनिसपटू ठरला.

काही आठवड्यांपूर्वी विक्रमी 13 वे फ्रेंच ओपन जिंकलेल्या नदालपूर्वी जिमी कॉनर्स, रॉजर फेडरर आणि इव्हान लेंडल यांनी ही कामगिरी केली. नदालने फेलिसिआनो लोपेझ याचा 4-6, 7-6 (7-5), 6-4 असा पराभव करीत हा टप्पा गाठला. त्याला हा टप्पा साजरा करण्यासाठी खास संधी देण्यात आली.

कोरोनातून रोनाल्डो सावरला आणि ज्युव्हेंट्सचा संघही 

एक हजार विजयांचा टप्पा नक्कीच मोलाचा आहे. हा जादूई आकडा आनंददायक आहे. आता याचा आनंद साजरा करीत असताना चाहते नव्हते, पण स्पर्धा संयोजक, पदाधिकारी, बॉल बॉईज यांच्यासह तो साजरा केला. त्यांच्या उपस्थितीने माझा आनंद द्विगुणित झाला, असे नदालने सांगितले.

एक हजाराचे मानकरी
जिमी कॉनर्स 1,274
रॉजर फेडरर 1,242
इव्हान लेंडल 1,068
रॅफेल नदाल 951
गुईलेर्मो विलास 951
नोवाक जोकोविच 932

नदालचे सर्वाधिक विजय
नोवाक जोकोविच 27
डेव्हिड फेरेर 26
रॉजर फेडरर 24
थॉमस बर्डीच 20
स्टॅन वॉवरिंका 19
अँडी मरे 17

कोर्टनुसार विजय
क्‍ले कोर्ट 482
हार्ड कोर्ट 445
ग्रास कोर्ट 71
कार्पेट 2

 


​ ​

संबंधित बातम्या