एटीपी वर्ल्ड टूर फायनल्स मध्ये उतरणार नदाल आणि जोकोविच

टीम ई-सकाळ
Saturday, 14 November 2020

जागतिक क्रमवारीतील अव्वल टेनिसपटू सर्बियाचा नोवाक जोकोविच 15 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या मोसमातील शेवटच्या एटीपी वर्ल्ड टूर फायनल्स स्पर्धेत सहभाग घेणार आहे.

जागतिक क्रमवारीतील अव्वल टेनिसपटू सर्बियाचा नोवाक जोकोविच 15 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या मोसमातील शेवटच्या एटीपी वर्ल्ड टूर फायनल्स स्पर्धेत सहभाग घेणार आहे. आणि तसेच नोवाक जोकोविच या स्पर्धेत बाजी मारून रॉजर फेडररच्या सहा वेळा विजेतेपदाच्या विक्रमाची बरोबरी साधण्याचा प्रयत्न करणार आहे. तर जागतिक क्रमवारीत दुसर्‍या क्रमांकावर असलेला खेळाडू स्पेनचा राफेल प्रथमच या स्पर्धेत उतरणार आहे. 

लिओनेल मेस्सीचा गोल अवैध

एटीपी वर्ल्ड टूर फायनल्स स्पर्धेत नोवाक जोकोविच टोकियो 1970 ग्रुपचे नेतृत्व करणार आहे. तर राफेल नदाल लंडन 2020 ग्रुपचे नेतृत्व करणार आहे. हंगामातील या शेवटच्या स्पर्धेत पात्र ठरलेल्या पहिल्या आठ खेळाडूंना सहभागी होता येते. जोकोविचच्या गटात रशियाचा पॅरिस मास्टर्स विजेता डॅनियल मेदवेदेव, जर्मनीचा अलेक्झांडर झ्वेरेव आणि अर्जेंटिनाचा डिएगो श्वेटझमान यांचा समावेश आहे. जोकोविचचा या स्पर्धेत 39-3 असा रेकॉर्ड असून, तो 13 व्या वेळी या स्पर्धेत खेळत आहे.     

"रोहितनं RCB ला एवढ्या ट्रॉफ्या जिंकून दिल्या असत्या का?"

जोकोविचने 2008, 2012, 2013, 2014, 2015 मध्ये पाच वेळा या स्पर्धेचे जेतेपद मिळवले आहे. जोकोविच आणि अमेरिकेचा पीट सॅम्प्रास या दोघांनीही पाच-पाच वेळेला या स्पर्धेचे जेतेपद मिळवलेले आहे.  तर फेडररने सहा वेळेस या स्पर्धेचे विजतेपद राखले आहे.  2003, 2004, 2006, 2007, 2010, 2011 मध्ये त्याने जेतेपद जिंकले आहे. 

 

 


​ ​

संबंधित बातम्या