गतज्जेत्या इगाचा डबल धमाका

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 9 June 2021

गतविजेत्या इगा स्विआतेकने फ्रेंच टेनिस स्पर्धेत सोमवारी रात्री महिला एकेरीची उपउपांत्यपूर्व फेरीची लढत जिंकल्यावर काही तासांतच दुहेरीची लढत जिंकण्याचा पराक्रम केला. रोलँ गॅरोवरील ही स्पर्धा सुरू झाल्यापासून रोज एकेरीतील किंवा दुहेरीतील लढत इगा खेळत आहे, पण तिच्या खेळातील जोष कायम आहे.

पॅरिस - गतविजेत्या इगा स्विआतेकने फ्रेंच टेनिस स्पर्धेत सोमवारी रात्री महिला एकेरीची उपउपांत्यपूर्व फेरीची लढत जिंकल्यावर काही तासांतच दुहेरीची लढत जिंकण्याचा पराक्रम केला. रोलँ गॅरोवरील ही स्पर्धा सुरू झाल्यापासून रोज एकेरीतील किंवा दुहेरीतील लढत इगा खेळत आहे, पण तिच्या खेळातील जोष कायम आहे.

इगाने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करताना मार्ता कॉस्तयुक हिला ६-३, ६-४ असे पराजित केले. कॉस्तयुक बहरात आहे, तसेच तिच्यावर कोणतेही दडपण नसल्यामुळे ती धक्कादायक निकाल नोंदवेल, अशी अपेक्षा होती, पण इगाने दडपणाखाली आपला खेळ बहरतो हे दाखवून दिले. सुरुवातीच्या पिछाडीनंतर इगाने रॅलीवर भर देत प्रतिस्पर्धीस चुका करण्यास भाग पाडले.

एकेरीत तसेच दुहेरीत चांगली कामगिरी होत आहे ते सुखावणारे आहे असे तिने सांगितले. तिने रोलँ गॅरोवरील सलग ११ लढतीत एकही सेट गमावलेला नाही. राफेल नदालसह सराव करीत असल्याचा तिला फायदा होत आहे. तिने बेथानी मॅत्तेक हिच्या साथीत दुहेरीची उपांत्य फेरी गाठली. इगा-बेथानीने दार्जिआ जुराक आणि आंद्रेजा किएपॅक यांना ६-३, ६-२ असे हरवले. गतवर्षी इगाने एकेरीची स्पर्धा जिंकली होती; तर दुहेरीत उपांत्य फेरी गाठली होती. इगा-बेथानीने रविवारी सात मॅच पॉइंटस् वाचवत विजय मिळवला होता. त्या तुलनेत आजचा विजय सोपा होता.

बोपन्ना पुरुष दुहेरीत पराजित
रोहन बोपन्ना आणि फ्रँको स्कुगॉर यांना पुरुष दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत हार पत्करावी लागली. बोपन्ना- स्कुगॉर यांना पाब्लो आंदुजार-पेद्रो मार्टिनेझ या स्पेनच्या जोडीविरुद्ध ५-७, ३-६ हार पत्करावी लागली. बोपन्ना-स्कुगॉरला उपउपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत बाय मिळाला होता.


​ ​

संबंधित बातम्या