जोकोविचचा फ्रेंच टेनिस स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 8 June 2021

पहिले दोन सेट गमावल्यानंतर नोवाक जोकोविचने अवघा एक गेम गमावत फ्रेंच टेनिस स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. जोकोविचने पहिले दोन सेट टायब्रेकरवर गमावले, त्यानंतर त्याने एक गेम गमावत चांगलीच पकड घेतली, अखेर त्याच्या प्रतिस्पर्ध्याने दुखापतीमुळे निर्णायक सेट अर्धवट सोडून दिला.

पॅरिस - पहिले दोन सेट गमावल्यानंतर नोवाक जोकोविचने अवघा एक गेम गमावत फ्रेंच टेनिस स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. जोकोविचने पहिले दोन सेट टायब्रेकरवर गमावले, त्यानंतर त्याने एक गेम गमावत चांगलीच पकड घेतली, अखेर त्याच्या प्रतिस्पर्ध्याने दुखापतीमुळे निर्णायक सेट अर्धवट सोडून दिला.

प्रतिस्पर्धी लॉरेंझो मुसेती याने लढत सोडून दिली, त्यावेळी नोवाक जोकोविच ६-७ (७-९) ६-७ (२-७) ६-१ ६-० ४-० असा आघाडीवर होता. मुसेतीने पहिले दोन सेट जिंकताना आपण जोकोविचसारख्या प्रतिस्पर्ध्याविरुद्ध लढतानाही कोणतीही धास्ती बाळगत नाही हे दाखवून दिले. त्याची ही पहिलीच ग्रँड स्लॅम आहे. 

माजी ऑस्ट्रेलियन कुमार विजेत्याने तेराव्या मानांकित डेव्हिड गॉफिनला पहिल्या फेरीत पराजित केले होते. पण चौथ्या सेटपासून त्याच्या हालचाली मंदावल्याचे दिसले. त्याने पोटात खूप दुखत असल्याचे सांगितले. दरम्यान, निर्णायक सेटपूर्वी जोकोविचने दुखावलेल्या बोटावर कोर्टवरच उपचारही करून घेतले. अर्थात नोवाक जोकोविचने पहिलले जोन सेट गमावल्यावर पिछाडीनंतर दिलेली झुंज जबरदस्त होती. 

गॉफ उपांत्यपूर्व फेरीत
माजी कुमारी विजेत्या कोको गॉफने प्रथमच उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. सतरा वर्षीय गॉफने २०१८ मध्ये कुमारी स्पर्धा जिंकली होती. तिने ऑन्स जेबॉरला ६-३, ६-१ असे हरवून आगेकूच केली. ग्रँड स्लॅम स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी प्रथमच गाठल्याने मी सुपर हॅपी आहे, मी खूपच छान खेळले, असे गॉफने सांगितले. स्पर्धा इतिहासात उपांत्यपूर्व फेरी गाठलेल्या सर्वात लहान खेळाडूच्या क्रमवारीत गॉफ दुसरी आहे. तिचे वय सध्या १७ वर्षे ८६ दिवस आहे. या क्रमवारीत निकोल वैदिसोवा (१७ वर्षे ४४ दिवस, २००६) अव्वल आहे. 

गॉफची लढत बार्बरा क्रेसिकोवा हिच्याविरुद्ध होईल. क्रेसिकोवाने माजी उपविजेत्या स्लोआन स्टीफन्स हिचा ६-२, ६-० असा धुव्वा उडवला. गॉफ तसेच क्रेसिकोवाने क्ले कोर्टवरील सलग नऊ लढती जिंकल्या आहेत. त्यांनी सरावाची स्पर्धा जिंकली आहे.


​ ​

संबंधित बातम्या