French Open 2020 : नदाल-जोकोविच यांच्यात रंगणार फायनल!

सकाळ स्पोर्ट्स ऑनलाईन टीम
Saturday, 10 October 2020

स्पॅनिश दिग्गज फ्रेंच ओपन स्पर्धा तेराव्यांदा गाजवून रॉजर फेडररच्या ग्रँडस्लॅमची बरोबरी करण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. जर त्याला फायनलमध्ये यश मिळाले तर हा त्याचा शंभरावा विजय ठरेल. नदालचा फ्रेंच ओपनमधील रेकॉर्ड 99- 2 असे जबरदस्त आहे.

जागतिक क्रमवारीत दुसर्‍या क्रमांकावर असलेल्या राफेल नदाल आणि अव्वलस्थानी असलेल्या नोवाक जोकोविच यांच्यात फ्रेंच जेतेपदासाठी फायनल लढत होणार आहे. स्पेनच्या  राफेल नदालने विक्रमी 13 व्यांदा फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे. लाल मातीचा बादशाह समजल्या जाणाऱ्या नदालने उपांत्य फेरीत अर्जेटिनाच्या दिएगो श्वार्ट्झमनवर विजय मिळवला. नदालने अंतिम फेरी गाठत रॉजर फेडररच्या 20 ग्रँडस्लॅम जेतेपदांशी बरोबरी साधण्याच्या दिशेने कूच केली आहे.

सेमीफायनलमध्ये नदालने श्वार्ट्झमनला 6-3, 6-3, 7-6 असे नमवत थाटात फायनलमध्ये प्रवेश केला. दुसऱ्या सेमी फायनलमध्ये सर्बियन नोवाक जोकोविचनं ग्रीकच्या स्टेफानोस त्सित्सिपास याला 6-3,6-2, 5-7,4-6-1 असे पराभूत करत फायनलमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे सुपर संडेमध्ये जागतिक क्रमवारीतील आघाडीतील स्टारमध्ये कोण बाजी मारणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. 

पिछाडीवर असतानाच जोकोविच जखमी कसा होतो?

स्पॅनिश दिग्गज फ्रेंच ओपन स्पर्धा तेराव्यांदा गाजवून रॉजर फेडररच्या ग्रँडस्लॅमची बरोबरी करण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. जर त्याला फायनलमध्ये यश मिळाले तर हा त्याचा शंभरावा विजय ठरेल. नदालचा फ्रेंच ओपनमधील रेकॉर्ड 99- 2 असे जबरदस्त आहे. या स्पर्धेत सेमीफायनल आणि फायनलमध्ये त्याने कधीच पराभव पाहिलेला नाही. मागील दोन आठवड्यात त्याने सातत्याने 15 सेट जिंकले आहेत. त्यामुळे यंदा फ्रेंच ओपनच मैदान तो गाजवणार की अव्वलस्थानी असलेला जोकोविच त्याला रोखणार हे पाहणे मजेशीर ठरेल. 

टी -20 क्रिकेटबाबत गावस्करांनी सुचवला पर्याय ; गोलंदाजांवरील दबाव कमी होणार? 

या दोघांमध्ये आतापर्यंत 8 वेळा ग्रँडस्लॅममध्ये सामना रंगल्याचे पाहायला मिळाले आहे. दोघांनी प्रत्येकी 4-4  सामन्यात बाजी मारली आहे. फ्रेंच ओपनमधील ही जोडी तिसऱ्यांदा समोरासमोर येणार आहे. यापूर्वी 2014 मध्ये नदाल आणि जोकोविच यांच्यात फ्रेंच ओपनची फायनल झाली होती. यात नदालने बाजी मारली होती.   


​ ​

संबंधित बातम्या