US Open 2020: ऑस्ट्रियाचा डॉमिनिक थिम अंतिम फेरीत; खिताबासाठी डॅनियल मेदवदेवशी होणार सामना    

टीम ई-सकाळ
Saturday, 12 September 2020

यंदाच्या यूएस ओपन स्पर्धेचा अंतिम सामना डॉमिनिक थिम आणि अलेक्झांडर ज्वेरेव यांच्यात होणार आहे. 

कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर सुरु झालेल्या टेनिस जगतातील चार महत्वाच्या ग्रँड स्लॅमपैकी एक असलेल्या यूएस ओपन स्पर्धेत द्वितीय मानांकित ऑस्ट्रियाच्या डॉमिनिक थिमने डॅनियल मेदवदेवला पराभूत करत अंतिम सामन्यात आपले स्थान निश्चित केले आहे. डॉमिनिक थिम आणि डॅनियल मेदवदेव यांच्यात झालेल्या उपांत्य सामन्यात डॉमिनिक थिमने 6-2, 7-6 (7), 7-6 (5) ने डॅनियल मेदवदेव वर विजय मिळवला. 

IPL 2020 : हिटमॅननंतर धोनीच्या भात्यातून उत्तुंग फटका (Video)   

त्यानंतर उद्या यंदाच्या यूएस ओपन स्पर्धेचा अंतिम सामना होणार असून, डॉमिनिक थिम आणि अलेक्झांडर ज्वेरेव हे खिताबासाठी भिडणार आहेत. तर यूएस ओपनच्या फायनल मध्ये पोहचलेला डॉमिनिक थिम हा ऑस्ट्रियाचा पहिला टेनिसपटू ठरलेला आहे. डॅनियल मेदवदेव विरूद्ध खेळल्या गेलेल्या उपांत्य सामन्यात थिमने जोरदार संघर्ष करत विजय मिळवला. 

हिटमॅनने मारलेला सिक्स आदळला चालत्या बसवर ; एकदा पहाच

दरम्यान, डॉमिनिक थिम आपल्या कारकिर्दीत पहिल्यांदाच यूएस ओपन ग्रँड स्लॅमच्या अंतिम सामन्यात पोहचला आहे. तर यापूर्वी 2018 आणि 2019 मध्ये फ्रेंच ओपन स्पर्धेच्या फायनलमध्ये राफेल नदालने डॉमिनिक थिमला पराभूत करून विजेतेपदापासून दूर राखले होते. याव्यतिरिक्त या वर्षाच्या सुरूवातीला ऑस्ट्रेलियन ओपनच्या अंतिम सामन्यात देखील त्याला सर्बियाच्या नोवाक जोकोविचकडून पराभव पत्करावा लागला होता.  


​ ​

संबंधित बातम्या