जोकोविचची सॅम्प्रासच्या विक्रमाशी बरोबरी 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 8 November 2020

जागतिक क्रमवारीत वर्षभर अग्रस्थान  कायम राखत जगातील पहिल्या क्रमांकाच्या सर्बियाचा नोवाक जोकोविचने अमेरिकेच्या माजी टेनिसपटू पीट सॅम्प्रासच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे.  

लंडन : जागतिक क्रमवारीत वर्षभर अग्रस्थान  कायम राखत जगातील पहिल्या क्रमांकाच्या सर्बियाचा नोवाक जोकोविचने अमेरिकेच्या माजी टेनिसपटू पीट सॅम्प्रासच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे.  

स्मृतीची ट्रेलब्लेझर्स हारली आणि मितालीच्या संघाचा खेळ झाला खल्लास!

सॅम्प्रासने 1993 ते 1998 पर्यंत सलग सहा वर्ष आपले अग्रस्थान कायम रखले होते.   नोवाक जोकोविचने 2011, 2012, 2014, 2015, 2018 आणि 2020 वर्षांमध्ये क्रमवारीत सहावेळा अग्रस्थान कायम राखत विक्रमाशी बरोबरी केली आहे. 

IPL 2020 : सर्वाधिक निर्धाव चेंडू केएल राहुलकडून

लहानपणापासूनच सॅम्प्रासचा खेळ पाहत मोठा झालो आहे., त्याच्यामुळेच मी या खेळाकडे वळलो, आता त्याच्या विक्रमाची बरोबरी करणे माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे, असे जोकोविच म्हणाला. 

 


​ ​

संबंधित बातम्या