बार्बोरा क्रेजिकोव्हाने फ्रेंच टेनिस स्पर्धेत महिला एकेरीपाठोपाठ दुहेरीतही बाजी

सकाळ वृत्तसेवा
Monday, 14 June 2021

बार्बोरा क्रेजिकोव्हाने फ्रेंच टेनिस स्पर्धेत महिला एकेरीपाठोपाठ दुहेरीतही बाजी मारली.

पॅरिस - बार्बोरा क्रेजिकोव्हाने फ्रेंच टेनिस स्पर्धेत महिला एकेरीपाठोपाठ दुहेरीतही बाजी मारली. 

बार्बोराने चेक प्रजासत्ताकच्या कॅटरिना सिनाआकोवा हिच्या साथीत इगा स्विआतेक आणि बेथरेनी मॅतेक यांना ६-४, ६-२ असे हरवले. मेरी पिअर्सने २००० फ्रेंच स्पर्धेत महिला एकेरी तसेच दुहेरीत बाजी मारली होती. त्यानंतर स्पर्धेत दुहेरी मुकुट जिंकलेली बार्बोरा पहिली खेळाडू ठरली. बार्बोरा या कामगिरीमुळे जागतिक दुहेरी क्रमवारीत अव्वल होईल; तर महिला एकेरीत पंधरावी होईल. गतविजेती स्विआतेक यंदा दुहेरी मुकुटासाठी प्रयत्नशील होती; पण तिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत आणि दुहेरीच्या अंतिम फेरीत हार पत्करावी लागली.


​ ​

संबंधित बातम्या