Australian Open womens doubles 2021 : आर्यना-एलिसे दुहेरीत विजेत्या
त्यांनी 2019 च्या ऑस्ट्रेलियन स्पर्धेपासून खेळण्यास सुरुवात केली होती.
आर्यना सॅबालेंका - एलिसे मेर्टेन्स यांनी महिला दुहेरीत विजेतेपद जिंकले. या द्वितीय मानांकित जोडीने तिसऱ्या मानांकित बार्बरा क्रेजसिकोवा - कॅटेरिना सिन्लाकोवा यांना 6-2, 6-3 असे हरवले. आर्यना - एलिसे यांनी 2019 मध्ये अमेरिकन स्पर्धा जिंकली होती. हे त्यांचे दुसरे विजेतेपद. त्यांनी 2019 च्या ऑस्ट्रेलियन स्पर्धेपासून खेळण्यास सुरुवात केली होती. आता तिथेच बाजी मारल्याने त्यांनी विजेतेपदासह उडी मारून आनंद साजरा केला.
बेल्जियम एलिसे मेर्टन्स आणि बेलारूस की आर्यना सॅबालेंका या जोडीनं सुरुवातीपासून आक्रमक खेळ केला. मर्टन्स आणि सॅबालेंका या दुसऱ्या मानांकित जोडीने मेलबर्नमध्ये झालेल्या ग्रँडस्लॅम फायनलमध्ये चेक प्रजासत्ताकच्या बार्बर क्रेजसिकोवा आणि कॅटेरिना सिन्लाकोवा या जोडीचा अजिबात निभाव लागला नाही.
Australian Open 2021: मेदवेदेवनं पहिल्यांदाच गाठली फायनल, जोकोविचचं मोठ चॅलेंज
सॅबालेंका आणि मेर्टेन्स यांनी अखेरच्या गेममध्ये तीन पॉइंट गमावले सॅबालेंकाने ऐस च्या मदतीने प्वाइंट मिळवला. त्यानंतर सिन्लाकोवाचा बॅकहँड बाहेर गेला. पुरुष दुहेरीत अमेरिकेच्या राजीव राम आणि ब्रिटनच्या जो सॅलिसबरीने स्कॉटलंडच्या जेमी मर्रे आणि ब्राझीलच्या ब्रूनो सोरेस जोडीला 6-4, 7-6 (2) असे पराभूत करत पुरुष दुहेरीच्या फायनलमध्ये स्थान मिळवले. गतविजेत्या चॅम्पियन राम आणि सॅलिसबरी फायनलमध्ये क्रोएशियाच्या इवान डोडिग आणि स्लोवाकियाच्या फिलिप पोलासेकविरुद्ध भिडणार आहेत.