Australian Open 2021 : जोकोविचचा ऐतिहासिक विजय; मेदवेदेवच्या पदरी निराशा

सकाळ स्पोर्ट्स ऑनलाईन
Sunday, 21 February 2021

मेलबर्न पार्कच्या कोर्टवर रंगलेल्या सामन्यात जोकोविचने सुरुवातीपासून वर्चस्व राखले.

मेलबर्न : सर्बियाचा नोवाक जोकोविचने ऑस्ट्रेलियन ओपनमधील आपला दबदबा कायम ठेवला आहे. रविवारी मेलबर्न पार्कवर रंगलेल्या अंतिम सामन्यात अव्वलमानांकित जोतोविचनं रशियन डेनियल मेदवेदेव याला 7-5, 6-2, 6-2 असे सरळ सेटमध्ये पराभूत केले. जागतिक क्रमवरीती अव्वलस्थानी असलेल्या जोकोविचने नवव्यांदा ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा जिंकली आहे. त्याच्या नावे आता 18 वेळा ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकल्याची नोंद झाली आहे.    

ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये नाओमीचा 'ब्रँड', चौथ्यांदा कोरलं ग्रँडस्लॅमवर नाव

मेलबर्न पार्कच्या कोर्टवर रंगलेल्या सामन्यात जोकोविचने सुरुवातीपासून वर्चस्व राखले. जोकोविचने पुन्हा एकदा डॅनियल मेदवेदेवचे कारकिर्दीतील पहिल्या ग्रँडस्लॅमचे स्वप्न उद्धवस्त केले. पुरुष एकेरीत सर्वाधिक ग्रँडस्लॅम जिंकणाऱ्या खेळाडूंमध्ये रोजर फेडरर आणि राफेल नडाल यांचा समावेश आहे. या दोघांनी प्रत्येकी 20-20 वेळा ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकली आहे. सर्वाधिक ग्रँडस्लॅम जिंकणाऱ्या पुरुष खेळाडूंच्या यादीत जोकोविच तिसऱ्या स्थानावर आहे. जोकोविच आणि मेदवेदेव यांच्यातील हा आठवा सामना होता. यात पुन्हा एकदा जोकोविच भारी ठरला त्याने 8 पैकी 5 सामन्यात मेदवेदेवला पराभूत केले आहे.  

 


​ ​

संबंधित बातम्या