एटीपी वर्ल्ड टूर फायनल्स : सेमीफायनलमध्ये जोकोविच आणि नदाल पराभूत  

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 22 November 2020

एटीपी वर्ल्ड टूर फायनल्स स्पर्धेत जागतिक क्रमवारीतील अव्वल खेळाडू नोवाक जोकोविच आणि स्पेनचा राफेल नदाल यांना उपांत्य फेरीत पराभवाचा सामना करावा लागला आहे.

एटीपी वर्ल्ड टूर फायनल्स स्पर्धेत जागतिक क्रमवारीतील अव्वल खेळाडू नोवाक जोकोविच आणि स्पेनचा राफेल नदाल यांना उपांत्य फेरीत पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे यावर्षीच्या अंतिम टेनिस स्पर्धेतील अंतिम सामना ऑस्ट्रियाच्या डॉमिनिक थीम आणि रशियाच्या डॅनिल मेदवेदेव यांच्यात खेळला जाईल. यूएस ओपन चॅम्पियन थीमने जोकोविचला 7-5, 6-7 (10), 7-6 (5) ने पराभूत केले. तर 20 ग्रँड स्लॅम जेतेपद जिंकणार्‍या नदालला मेदवेदेवने 3-6, 7-6 (4), 6-3 ने हरवले. 

इंग्लिश प्रीमिअर लीग : न्यू कॅसलवर विजय मिळवत चेल्सी दुसऱ्या स्थानी झेप  

नोवाक जोकोविचने जर्मनीच्या अलेक्झांडर ज्वेरेव्हला 6-3, 7-6 (4) ने नमवत नवव्या वेळेस स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये प्रवेश केला होता. मात्र त्यानंतर जोकोविचला डॉमिनिक थीमकडून पराभव स्वीकारावा लागला आहे. व त्यासोबतच थीम गेल्या चार वर्षांत पहिला खेळाडू ठरला आहे ज्याने सलग स्पर्धेच्या फायनल मध्ये धडक मारली आहे. आणि जोकोविचवर त्याने पाचवा विजय मिळवला असून,  हा थीमचा 300 वा एटीपी टूर विजय आहे. 

ISL Season 7 : नॉर्थईस्ट युनाइटेडचा मुंबई सिटीवर विजय    

याशिवाय, जोकोविच 13 व्या वेळेस या स्पर्धेत खेळत होता. तर डॅनिल मेदवेदेवने राफेल नदालला रोखत त्याचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आणले. त्यामुळे नदालचे 16 वर्षांत प्रथमच विजेतेपद जिंकण्याचे स्वप्न पुन्हा एकदा राहिले आहे.     


​ ​

संबंधित बातम्या