इटालियन टेनिस स्पर्धा: 18 वर्षीय नवोदितासमोर तीन वेळचा ग्रँडस्लॅम विजेता पराभूत

टीम ई-सकाळ
Wednesday, 16 September 2020

इटालियन टेनिस स्पर्धेत स्टॅन वावरिंकाला पहिल्याच फेरीत पराभवाचा सामना करावा लागला आहे.

इटालियन टेनिस स्पर्धेत स्टॅन वावरिंकाला पहिल्याच फेरीत पराभवाचा सामना करावा लागला आहे. 18  वर्षीय स्थानिक खेळाडू लॉरेन्झो मुसेट्टीने इटालियन ओपन टेनिसच्या पहिल्या फेरीत स्टॅन वावरिंकाचा 6 -0, 7- 6 ने पराभव केला. या सामन्यात तीन वेळा ग्रँड स्लॅम जिंकणार्‍या वावरिंकाच्या प्रत्येक शॉटला लॉरेन्झो मुसेट्टीने जोरदार उत्तर देत विजय मिळवला. नुकत्याच पार पडलेल्या यूएस ओपन स्पर्धेत स्टॅन वावरिंकाने सहभाग घेतला नव्हता. 

‘पेटीएम फर्स्ट गेम’चा सचिन तेंडुलकर ब्रँड अ‍ॅम्बेसेडर ; सीएआयटीची टीका    

लॉरेन्झो मुसेट्टीने 2018 मध्ये जूनियर अमेरिकी ओपन स्पर्धेचे उपविजेतेपद मिळवले होते. तर 2019 मध्ये ज्युनियर ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा जिंकली होती. यानंतर मुसेट्टीचा सामना केई निशिकोरीशी होणार आहे. तर या स्पर्धेतील दुसऱ्या सामन्यात वाईल्ड कार्ड मिळालेल्या इटालियन साल्वाटोर कारुसोने यूएस ओपन स्पर्धेत क्वालिफायर फेरी गाठलेल्या सँडग्रेनचा पराभव केला. त्यानंतर साल्वाटोर कारुसोचा सामना सर्बियाचा अव्वल टेनिसपटू नोवाक जोकोविच सोबत होणार आहे. 

 याशिवाय, महिलांच्यात  कैटरीना सिनिआकोव्हाने तीन वेळा ग्रँड स्लॅम चॅम्पियन अँजेलिक कर्बरचा 6-6, 6-1 असा पराभव केला. त्याच वेळी, 16 वर्षीय अमेरिकन कोको गॉ ने ओन्स जेबेरचा 6-6, 6-3 असा पराभव केला. आता त्यांचा सामना फ्रेंच ओपन आणि विम्बल्डन चॅम्पियन गार्बाईन मुगुरुझाशी होणार आहे.        

 

 


​ ​

संबंधित बातम्या