सेरेनाच्या सामन्यांवर पंचांचा बहिष्कार?

वृत्तसंस्था
Wednesday, 12 September 2018

अनुभवी रॅमोस 
- पोर्तुगालचे 47 वर्षीय रॅमोस "गोल्ड बॅज' रेफ्री 
- सध्या सक्रिय असलेल्या पंचांमध्ये चारही ग्रॅंड स्लॅम स्पर्धांत पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात काम केलेले एकमेव 
- फ्रेंच, विंबल्डन व अमेरिकन या तीन ग्रॅंड स्लॅम स्पर्धांत महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात चेअर अंपायर 

लंडन : सेरेना विल्यम्सने "चोर' संबोधलेले चेअर अंपायर कार्लोस रॅमोस यांना पाठिंबा देण्यास आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघाने (आयटीएफ) विलंब लावल्यामुळे पंच व पदाधिकारी संतापले झाले आहेत. "युनियन' स्थापन करून सेरेनाच्या सामन्यांवर बहिष्कार घालण्याचा त्यांचा विचार आहे. 

सेरेना पंचांची माफी मागत नाही तोपर्यंत तिच्या सामन्यांत काम करायचे नाही, अशी भूमिका घेण्याचा त्यांचा विचार आहे. पुरुष आणि महिला खेळाडूंच्या बाबतीत पंच भेदभाव करतात, असा आरोपही सेरेनाने केला आहे. तिच्या दाव्यास महिला टेनिसची शिखर संघटना "डब्ल्यूटीए' आणि अमेरिकन ओपनची संयोजन संघटना "युस्टा' यांनी पाठिंबा दिला आहे. "युस्टा'ने सेरेनाला दंड मात्र केला आहे. याच "युस्टा'ने पंचांना अनेक वेळा पाठिंबा दिला नाही. रॅमोस यांनी आपले काम नियमानुसार केले आणि अपशब्द खपवून घेतले नाही. यामुळे त्यांना वाऱ्यावर सोडले गेले. "आयटीएफ'ने पाठिंबा देण्यास 48 तास लावल्यामुळेही पंच संतापले आहेत. 

या स्पर्धेत पंचांवर टीका होण्याचे यापूर्वीही दोन प्रसंग घडले. ऑस्ट्रेलियाच्या नीक किर्गीऑसला खेळण्याबद्दल प्रेरित करून पंचांनी शिष्टाचारांचा भंग केला अशी ताकीद स्वीडनचे पंच महंमद लाह्यानी यांना देण्यात आली. फ्रान्सच्या अलिझ कॉर्ने हिने कोर्टवर जर्सी बदलली. त्याबद्दल तिला पंच ख्रिस्तियन रस्क यांनी ताकीद दिली. रस्क यांच्यावरही टीका झाली. सेरेनाने मात्र पंचांना "चोर' म्हणतानाच माफी मागण्यासाठी रॅमोस यांच्यावर दडपण आणले. त्यानंतर अनेक प्रमुख खेळाडूंनी सेरेनाला पाठिंबा दिला आहे. या पार्श्‍वभूमीवर पंचांनी कडक भूमिका घेतली आहे. 

अनुभवी रॅमोस 
- पोर्तुगालचे 47 वर्षीय रॅमोस "गोल्ड बॅज' रेफ्री 
- सध्या सक्रिय असलेल्या पंचांमध्ये चारही ग्रॅंड स्लॅम स्पर्धांत पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात काम केलेले एकमेव 
- फ्रेंच, विंबल्डन व अमेरिकन या तीन ग्रॅंड स्लॅम स्पर्धांत महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात चेअर अंपायर 


​ ​

संबंधित बातम्या