जोकोविच मुलांसाठी बनला 'घोडा'

वृत्तसंस्था
Sunday, 26 August 2018

नोव्हाक जोकोविचने नुकतेच सिनसिनाटी ओपन टेनिस स्पर्धा जिंकताना जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असणाऱ्या स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररचा 6-4, 6-4 असा सहज पराभव केला होता.

बेलग्रेड : मुलांना आनंदी ठेवण्यासाठी वडिलांना काय काय करावे लागते, याची प्रचिती सर्बियाचा टेनिसपटू नोव्हाक जोकोविच याच्याबाबतीत पाहायला मिळाली आहे. 

नोव्हाक जोकोविचने नुकतेच सिनसिनाटी ओपन टेनिस स्पर्धा जिंकताना जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असणाऱ्या स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररचा 6-4, 6-4 असा सहज पराभव केला होता. कारकिर्दीत जोकोविचला एटीपी मास्टर्स 1000 या श्रेणीतील याच विजेतपदाने अनेकदा हुलकावणी दिली होती. सहाव्या प्रयत्नांत त्याने येथे विजेतेपद मिळविले.

या विजेतेपदानंतर त्याने मुलांसोबत घरात खेळतानाचे फोटो ट्विटरवर प्रसिद्ध केले आहेत. या फोटोमध्ये तो आपल्या मुलगा आणि मुलीला खेळवितानाचे दोन फोटो प्रसिद्ध केले आहेत. मुलाला पाठीवर घेऊन चक्क तो घोडा झाल्याचे दिसत आहे. या ट्विटला त्याने किड्स डे कन्टीन्यूज असे नाव दिले आहे. यानिमित्ताने जोकोविचच्या चाहत्याना त्याचे मुलांना सांभाळ करतानाचे रुपही पाहायला मिळाले आहे.


​ ​

संबंधित बातम्या