टेनिसपटू अँडी मरेला 'क्वीन्स' वाइल्ड कार्ड 

वृत्तसंस्था
Tuesday, 7 May 2019

क्वीन्स क्‍लब ही ग्रास कोर्टवरील प्रतिष्ठेची स्पर्धा मानली जाते. मरेच्या कंबरेवर शस्त्रक्रिया झाली आहे. त्यामुळे त्याला आकस्मिक निवृत्ती पत्करावी लागेल अशी शक्‍यता होती; पण त्याने पुनरागमनाचा एक प्रयत्न करायचे ठरविले आहे.

लंडन : ब्रिटनचा टेनिसपटू अँडी मरे याला क्वीन्स क्‍लब टेनिस स्पर्धेच्या संयोजकांनी वाइल्ड कार्ड दिले आहे. ही स्पर्धा 17 ते 23 जूनदरम्यान होते. विंबल्डनच्या पूर्वतयारीसाठी स्पर्धेचे आयोजन केले जाते.

क्वीन्स क्‍लब ही ग्रास कोर्टवरील प्रतिष्ठेची स्पर्धा मानली जाते. मरेच्या कंबरेवर शस्त्रक्रिया झाली आहे. त्यामुळे त्याला आकस्मिक निवृत्ती पत्करावी लागेल अशी शक्‍यता होती; पण त्याने पुनरागमनाचा एक प्रयत्न करायचे ठरविले आहे. त्यासाठी त्याची तयारी सुरू आहे, पण तो स्पर्धात्मक पातळीवर नेमका पुन्हा केव्हा खेळणार हे अद्याप ठरलेले नाही. सध्या त्याची जागतिक क्रमवारीत 217व्या क्रमांकावर घसरण झाली आहे.

ऑस्ट्रेलियन ओपन या मोसमातील पहिल्या ग्रॅंड स्लॅम स्पर्धेपूर्वी मरेने विंबल्डननंतर निवृत्ती घ्यावी लागेल असे जाहीर केले होते. त्याच वेळी ऑस्ट्रेलियन ओपन ही आपली शेवटची स्पर्धा ठरू शकेल असेही तो म्हणाला होता. त्या स्पर्धेत तो पहिल्याच फेरीत हरला होता. मरे 31 वर्षांचा आहे. त्याने एका जागी स्थिर असलेला चेंडू मारण्यास सुरवात केली आहे. आता वेदना होत नाहीत असे त्याने सांगितले आहे, पण सराव करण्याइतपत तो केव्हा तंदुरुस्त होणार हे अद्याप स्पष्ट नाही.

संबंधित बातम्या