व्हिडीओ: लिएंडर पेसने संन्यास घेण्याविषयी थेट चाहत्यांना मागीतला सल्ला

सकाळ वृत्तसेवा
Monday, 11 May 2020

मागच्या वर्षी पेसने 2020 च्या मोसमाअखेर हे माझे अंतराष्ट्रीय करिअरचे शेटचे सत्र असेल अशी घोषणा केली होती परंतू कोरोना व्हायरसच्या साथीमुळे ऑलिम्पिक सह सर्वच क्रीडा आयोजने स्थगीत किंवा रद्द करण्यात आले आहेत.

भारताचा दिग्गज टेनिसपटू लिएंडर पेस अंतराष्ट्रीय करिअरमधून सन्यास घेण्याचा निर्णयाची घोषणा कोरोना व्हायरस संपून खेळ पुन्हा सुरु झाल्यानंतर करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी पेसने 2021 मध्ये खेळणे सुरु ठेवावे की नाही याबद्द चाहत्यांकडे सल्ला मागीतला आहे. पेसने त्याच्या टेनिस करिअरमध्ये आजवर सर्व मिळून 18 ग्रँडस्लॅम किताब जिंकले आहेत. ट्विटरवरती केलेल्या लाईव्ह चॅट दरम्यान चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली, त्यादरम्यान विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना चाहत्यांनाच 2021 मध्ये खेळणे सुरु ठेवावे की नाही याबद्दल विचारणा केली. 

मागच्या वर्षी पेसने 2020 च्या मोसमाअखेर हे माझे अंतराष्ट्रीय करिअरचे शेटचे सत्र असेल अशी घोषणा केली होती परंतू कोरोना व्हायरसच्या साथीमुळे ऑलिम्पिक सह सर्वच क्रीडा आयोजने स्थगीत किंवा रद्द करण्यात आले आहेत. त्यामुळे 46 वर्षीय पेसच्या निवृत्तीबद्दल परत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 

 

 

पेसने त्यापुढे सांगीतले की, “ऑलिम्पिक स्पर्धा एक वर्षासाठी पुढे ढकलण्यात आली आहे. ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या वेळापक्त्रकात बदल करण्यात आले आहेत, फ्रेंच ओपन ऑक्टोबरमध्ये होणार आहे, युएस ओपन न्यूयॉर्कच्या बाहेर खेळण्यात .येणार आहे तर विम्बल्डन स्पर्धा रद्द करण्यात आली आहे त्यामुळे माझ्यासाठी पुढचा निर्णय घेणे रोमांचक झाले आहे”

लॉकडाऊनच्या काळात तिन ते चार तास सराव करत आहे त्यासोबत फिटनेस सांभाळण्यासाठी जीममध्ये घाम गाळत आहे, पण मला खेळत राहण्यासाठी प्रेरणेची गरज आहे चाहत्यानी उत्तर दिले तर कदाचीत त्या प्रेणाना मिळेल आणि पुढे खेळत राहण्याचा निर्णय घेता येईल, जेव्हा परिस्थीती सुधारेल तेव्हा माझे सहकारी पुढच्या वाटाचालीबद्दल निर्णय घेतील असे पेसने या प्रश्न-उत्तरांचच्या दरम्यान सांगातले.
 


​ ​

संबंधित बातम्या