टेनिस 'सौंदर्यसम्राज्ञी' मारिया शारापोव्हाचा टेनिसला अलविदा!

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 26 February 2020

2004 मध्ये वयाच्या 17 व्या वर्षी विम्बल्डनचे विजेतेपद जिंकणारी ती तिसरी लहान खेळाडू ठरल्यावर 2005 मध्ये ती जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानावर गेली आणि लगेचच पुढच्या वर्षी तिने अमेरिकन ओपनही जिंकली होती. 

पॅरिस : महिला टेनिसमध्ये लावण्यवती म्हणून खेळाएवढीच प्रसिद्धी मिळवणाऱ्या रशियाच्या मारिया शारापोवाने वयाच्या 32 व्या वर्षीय टेनिसला गुडबाय केले आहे. 17 व्या वर्षी प्रतिष्ठेच्या विम्बल्डनचे विजेतेपद मिळवल्यानंतर मारिया प्रकाशझोतात आली होती. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

Image may contain: 1 person, playing a sport and tennis

टेनिस- मी तुला गुडबाय करत आहे, असे शारापोवाने एका मॅक्‍सिनमधील लेखात म्हटले आहे. 28 वर्षांच्या कारकिर्दीत पाच ग्रॅंड स्लॅम आणि इतर अनेक स्पर्धा जिंकल्यानंतर दुसरे शिखर गाठायचे आहे. वेगळ्या मार्गावर प्रवास करायचा आहे, असे शारापोवाने लिहिले आहे. 

- पराभव मागे लागला अन् विराटने गमावले कसोटीतील अव्वल स्थान

प्रसिद्धी आणि वादही 

नैसर्गिक शैली असलेली शारापोवाचा खेळ पहाणे ही अनेकांसाठी पर्वणी असायची. लहान वयात विम्बल्डनचे विजेतेपद मिळवून प्रसिद्धीच्या शिखरावर पोहणारी शारापोवा वादग्रस्तही ठरली होती. 2016 च्या ऑस्ट्रेलिया टेनिस स्पर्धेत उत्तेजक घेतल्याचे जाहीर केल्यानंतर तिला 15 महिन्यांच्या बंदीलाही सामोरे जावे लागले होते. 

Image may contain: 1 person, playing a sport and outdoor

अव्वल क्रमांक 

पाच ग्रॅंडस्लॅम विजेतेपदा बरोबर ती महिलांच्या जागतिक टेनिसमध्ये अव्वल स्थानावरही पोहोचली होती. सध्या 373 हे तिचे मानांकन होते. कारकिर्द शिखरावर असताना शारापोवाला विविध दुखापतींचा त्रास सहन करावा लागला. खांद्याची दुखापत तर तिला हैराण करणारी होती. या दुखापतीमुळे ती गेल्या काही वर्षांत अपवादानेच खेळत होती. 

Image may contain: 1 person, playing a sport

- आशिया इलेव्हन संघात भारताचा 'या' स्टार खेळाडूला जागाच नाही; बघा संघ

2004 मध्ये वयाच्या 17 व्या वर्षी विम्बल्डनचे विजेतेपद जिंकणारी ती तिसरी लहान खेळाडू ठरल्यावर 2005 मध्ये ती जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानावर गेली आणि लगेचच पुढच्या वर्षी तिने अमेरिकन ओपनही जिंकली होती. 

Image may contain: 1 person, outdoor

2007 पासून शारापोवाची कारकिर्द खांद्याच्या दुखापतीमुळे उतरणीस लागत होती. पण पुढच्या वर्षी ऑस्ट्रेलियन स्पर्धा जिंकल्यावर दुसऱ्यांदा खांदा दुखापत झाली. तरीही ती लढत राहिली होती. 2012 मध्ये फ्रॅंच ओपन आणि ऑलिंपिक रौपपदक जिंकून तिने ग्रॅंडस्लॅम पूर्ण केले. असे यश मिळवणारी ती 10 वी महिल टेनिसपटू ठरली होती. 

- पाच वर्षे संघात खेळला नाहीये तरी परत यायचा कॉन्फिडन्स बघा याचा

मी कधी मागेही पाहिले नाही आणि पुढचाही विचार केला नाही, हेच माझ्या यशाचे गमक ठरले. मी सतत स्वतःला प्रोत्साहित करत राहिले त्यामुळे मी या स्थानावर पोहचले. 
- मारिया शारापोवा

 Image may contain: 1 person


​ ​

संबंधित बातम्या