गांगुलीला वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा! वाचा काय म्हणाला सचिन... 

टीम ई-सकाळ
Wednesday, 8 July 2020

2002 मधील चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचे संयुक्त विजेतेपद आणि 2003 मधील आयसीसीच्या एकदिवसीय विश्वचषकात उपविजेतेपद राखत भारतीय संघाने आंतरराष्ट्रीय क्रिकेट विश्वात दबदबा निर्माण केला. त्यामुळे टीम इंडियाला आकार देण्याचे महत्वाचे काम करणाऱ्या माजी कर्णधार सौरव गांगुलीचा आज वाढदिवस. 

नव्वदच्या दशकात सामना निश्चितीचे ग्रहण लागलेल्या टीम इंडियाला पुन्हा रुळावर आणण्याचे काम सौरव गांगुलीने केले. आणि त्यानंतरच भारतीय क्रिकेट संघाचा चेहरा मोहराच बदलत गेला. 2000 मध्ये सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने आक्रमक खेळी करत परदेशात देखील विजय प्राप्त करण्यास सुरवात केली. त्यामुळे परदेशात सोडून फक्त घरच्याच मैदानात शेर असल्याचा ठपका भारतीय संघाला पुसता आला. तसेच 2002 मधील चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचे संयुक्त विजेतेपद आणि 2003 मधील आयसीसीच्या एकदिवसीय विश्वचषकात उपविजेतेपद राखत भारतीय संघाने आंतरराष्ट्रीय क्रिकेट विश्वात दबदबा निर्माण केला. त्यामुळे टीम इंडियाला आकार देण्याचे महत्वाचे काम करणाऱ्या माजी कर्णधार सौरव गांगुलीचा आज वाढदिवस. 

BlOG : गोऱ्यांच्या देशात क्रिकेट मैदानावर उठणार अन्यायाविरोधात आवाज

सौरव गांगुलीला वाढदिवसानिमित्त क्रीडा जगतातून शुभेच्छा देण्यात येत आहेत. सौरव गांगुली आज  वयाच्या 49 व्या वर्षात पदार्पण करत आहे. सौरव गांगुली आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर या दोघांची जोडी सलामीवीर म्हणून संघासाठी चांगलीच यशस्वी ठरली. सचिन आणि सौरव यांच्या वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक सलामीची भागीदारी करण्याचा विक्रम आहे. तसेच या दोघांची मैत्री देखील क्रिकेटच्या मैदानातून बाहेर देखील तितकीच घट्ट असल्याचे वेळोवेळी दिसले आहे. सौरव गांगुली भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (बीसीसीआय) अध्यक्ष झाल्यानंतर सचिन तेंडुलकर गांगुलीला 'दादी' म्हणत शुभेच्छा दिल्या होत्या. त्यानंतर आज सचिन तेंडुलकरने सोशल मीडियाच्या ट्विटरवर सौरव गांगुलीला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. या ट्विट मध्ये देखील सचिनने गांगुलीला 'दादी' म्हणत, आपल्या मैदानावरील भागीदारी प्रमाणेच मैदानाबाहेरची भागीदारी देखील अशीच रहावी अशी इच्छा सचिनने व्यक्त केली आहे.  

        

दरम्यान, एकदिवसीय क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुलीने सर्वाधिक वेळा 150 किंवा त्याहून अधिक धावांची भागीदारी करून विक्रम नोंदविला आहे. या दोघांनी सलामीवीर म्हणून 12 एकदिवसीय सामन्यात 150 हून अधिक धावांची भागीदारी केली आहे. त्यामुळेच टीम इंडियाला अनेकदा जिंकण्यात सचिन आणि सौरवच्या जुगलबंदीने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. आज ही जोडी क्रिकेटच्या मैदानापासून दूर असली तरी सलामीवीर म्हणून या जोडीचे उदाहरण दिले जाते.     

 


​ ​

संबंधित बातम्या