13 वर्षीय मुंबईकर रेसलिंग गर्लला मिळाली मोठी संधी

टीम ई-सकाळ
Monday, 29 June 2020

या प्रोजेक्टच्या अंतर्गत ट्रेनिंग कम सिलेक्शन प्रक्रियाचे चार टप्पे असतील. पहिल्या टप्प्यात शूट आउटचा समावेश असून 12 ते 13 ऑक्टोबरमध्ये पहिल्या टप्प्यात आशी कशी कामगिरी करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.  

मुंबई: नवोदित रेसलिंग स्टार आशी हंसपाल हिची एफआयएच्या गर्ल्स ऑन ट्रॅक-रायजिंग स्ट्रार्स या प्रोजेक्टसाठी निवड झाली आहे. भारतीय मोटारस्पोर्ट नियमाक संस्था असलेल्या  एफएमएससीआय यासंदर्भातील माहिती दिली आहे. मुंबईच्या 13 वर्षीय आशीची निवड झालेल्या या प्रोजेक्टमध्ये 12 ते 16 वर्ष वयोगटातील अन्य 19 मुलींचा समावेश आहे.  यासाठी पाच वेगवेगळ्या खंडात 70 जणांनी अर्ज केले होते. त्यातून तिची वर्णी लागली आहे. प्रोजेक्टच्या पहिल्या टप्प्यात आशी 12 ते 13 ऑक्टोबर दरम्यान फ्रान्समधील पॉल रिचर्ड सर्किट येथे आयोजित शूट आउट प्रोग्राममध्ये भाग घेणार आहे. 

ऑस्ट्रेलियात सापडला टेनिस 'फिक्सर'; बीसीसीआय काय पाऊल उचलणार

महिला मोटरस्पोर्टसमधील सर्वात मोठी संस्था असलेल्या एफआयए विमेनच्या अध्यक्षा मिशेल माउंटन यांनी यासंदर्भात आशीच्या नावे एक पत्रही लिहिले आहे. आमच्या ट्रॅनिंग कॅम्पमध्ये सहभागी होण्याची संधी देण्यात येत आहे. एफआयए एफ-4च्या हंगामासाठी शुभेच्छा! असा उल्लेख या पत्रात करण्यात आला आहे. या प्रोजेक्टच्या अंतर्गत ट्रेनिंग कम सिलेक्शन प्रक्रियाचे चार टप्पे असतील. पहिल्या टप्प्यात शूट आउटचा समावेश असून 12 ते 13 ऑक्टोबरमध्ये हा टप्पा पार पडेल. यातून आघाडीच्या चार स्पर्धकांना पुढच्या फेरीत प्रवेश मिळेल. 14 ते 15 ऑक्टोबर दरम्यान दुसऱ्या टप्प्यात कार्टिंगमधून 8 स्पर्धकांना पुढच्या टप्यात प्रवेश दिला जाईल. 3 ते 4 नोव्हेंबरमध्ये तिसऱ्या टप्प्यात चार स्पर्धक उरतील. ते अंतिम फेरीस पात्र ठरतील. चौथ्या टप्प्यात फरारी चालक अकादमी प्रशिक्षण शिबीर (एफ4) 9 ते 13 नोव्हेंबर पर्यंत (टीबीसी), मारानेलो, इटलीमध्ये पार पडेल. यात अंतिम विजेता निश्चित केला जाईल.  

क्रिकेटच्या मैदानातील 'हे' लाजिरवाणे रेकॉर्ड तुम्हाला माहित आहेत का?

भारतीय महिला मोटर स्पोर्टमधील सर्वोच संस्थेच्या प्रोजेक्टसाठी आशीची झालेली निवड ही भारतीय मोटारस्पोर्टमधील महिलांना प्रेरणा देणारी ठरेल, असे एफएमएससीआयच्या अध्यक्ष सीता रैना यांनी म्हटले आहे. मागील हंगामात आशीने चांगली कामगिरी करुन दाखवली होती.  तिच्यामध्ये भविष्यात स्टार रेसलर बनण्याची क्षमता आहे, असेही सीता रैना यावेळी म्हणाल्या.  मुंबईतील रेयो रेसिंग अकादमीमध्ये आठ वेळा राष्ट्रीय कार रेसिंग चॅम्पियन रेओमंड बॅनाजी यांच्या मार्गदर्शनाखाली मागील वर्षी आशीने आपल्या पहिल्या राष्ट्रीय काटिंर्ग हंगामात चांगली कामगिरी करुन दाखवली होती. या कामगिरीसाठी तिला एफएमएससीआयने  मोटरस्पोटर्स पुरस्कारामधील उत्कृष्ट महिला चालक पुरस्कार देऊन गौरव केला होता.   


​ ​

संबंधित बातम्या