Team India : श्रीलंका-ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेसाठी दोघांचे कमबॅक; तर दोघांना रेस्ट!

वृत्तसंस्था
Monday, 23 December 2019

बुमराने राष्ट्रीय अकादमीत चाचणी देण्यास नकार दिला होता, तर 'बीसीसीआय' अध्यक्ष सौरभ गांगुली यांनी त्याला राष्ट्रीय अकादमीतच चाचणी घेणे अनिवार्य असल्याचे सांगितले होते.

नवी दिल्ली : राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत जाण्यास नकार दिलेल्या जसप्रीत बुमराला अकादमीच्या तंदुरुस्ती प्रमाणपत्रापूर्वीच निवड समितीने भारतीय संघात पुनरागमनाची संधी दिली आहे. त्याच्यासह सलामीचा फलंदाज शिखर धवनही श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या आगामी टी-20 आणि एकदिवसीय सामन्यांसाठी भारतीय संघात पुनरागमन करेल. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

या दोन्ही मालिकेसाठी संघ जाहीर करताना फॉर्मात असलेल्या रोहित शर्मा आणि महंमद शमी यांना श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. 

- INDvsWI : शार्दुल भावा, विराटने चक्क केलं मराठीत कौतुक, पाहा...

गुडघ्याच्या दुखापतीने संघातील स्थान गमवावे लागलेला धवन आणि पाठीच्या दुखण्यावरील उपचारासाठी ब्रेक घेणारा जसप्रीत बुमरा तंदुरुस्त असल्याचे मानून त्यांचा टी-20 आणि एकदिवसीय अशा दोन्ही संघात स्थान मिळाले आहे. अर्थात, बुमराच्या तंदुरुस्ती शिफारशीचा प्रश्‍न अजून अनुत्तरीत आहे. राष्ट्रीय क्रिकेट अकादमीने त्याला तंदुरुस्ती प्रमाणपत्र देण्यापूर्वीच संघात स्थान देण्यात आल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. 

- IND vs WI : अर्धशतकासह 'हिटमॅन'ने मोडला 22 वर्षांपूर्वीचा विक्रम!

बुमराने राष्ट्रीय अकादमीत चाचणी देण्यास नकार दिला होता, तर 'बीसीसीआय' अध्यक्ष सौरभ गांगुली यांनी त्याला राष्ट्रीय अकादमीतच चाचणी घेणे अनिवार्य असल्याचे सांगितले होते. निवड समिती अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी या दोघांच्या तंदुरुस्ती प्रमाणपत्राचा उल्लेख केलेला नाही. 

अतिक्रिकेटचे आणखी बळी पडू नयेत, यासाठी या वेळी निवड समितीने रोहित शर्मा आणि वेगवान गोलंदाज महंमद शमी यांना श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आहे. 

भारत श्रीलंकेविरुद्ध तीन टी-20 तसेच ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. श्रीलंकेविरुद्धची मालिका 5 जानेवारी, तर ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका 14 जानेवारीपासून सुरू होईल. 

- INDvsWI : भारताचा 'विराट' विजय; तिसऱ्या सामन्यासह मालिकाही जिंकली!

भारतीय संघ :

श्रीलंकेविरुद्ध : विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, केएल राहुल, श्रेयस अय्यर, रिषभ पंत (यष्टिरक्षक), रवींद्र जडेजा, शिवम दुबे, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमरा, नवदीप सैनी, शार्दूल ठाकूर, मनीष पांडे, वॉशिंग्टन सुंदर, संजू सॅमसन 

ऑस्ट्रेलियाविरुद्ध : विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, केएल राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, रिषभ पंत (यष्टिरक्षक), केदार जाधव, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, नवदीप सैनी, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमरा.


​ ​

संबंधित बातम्या