विराटच्या नेतृत्वाखाली प्रथमच संघात नाही बदल

वृत्तसंस्था
Thursday, 30 August 2018

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली प्रथमच भारतीय संघ सलग दुसऱ्या कसोटी सामन्यात कायम ठेवण्यात आला आहे. भारताविरुद्धच्या चौथ्या कसोटीत इंग्लंडचा कर्णधार ज्यो रुटने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय़ घेतला आहे.

साउदम्पटन : भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली प्रथमच भारतीय संघ सलग दुसऱ्या कसोटी सामन्यात कायम ठेवण्यात आला आहे. भारताविरुद्धच्या चौथ्या कसोटीत इंग्लंडचा कर्णधार ज्यो रुटने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय़ घेतला आहे.

विराट कोहली 2015 पासून भारतीय कसोटी संघाचे कर्णधारपद भूषवत आहे. त्याच्या नेतृत्वाखाली आतापर्यंत खेळलेल्या 38 सामन्यांमध्ये त्याने सतत बदल केले आहेत. कोहलीने आपल्या डावपेचात कायम बदल केल्याचे हे उदाहरण आहे. मात्र, यंदा त्याने इंग्लंड दौऱ्यात कोणताही धोका न पत्करता तिसऱ्या कसोटीतील विजयी संघ कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. पाच सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघ 2-1 ने पिछाडीवर आहे.

विराट म्हणाला, की संघात दरवेळी काही बदल कऱणे गरजेचे नसते. यासाठी दुखापतीही जबाबदार असतात. त्याचाही विचार करावा लागतो. सध्याच्या संघात कोणताही बदल करावा असे न वाटल्याने विजयी संघ चौथ्या कसोटीत कायम ठेवला. 

भारतीय संघ : शिखर धवन, के. एल. राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली. अजिंक्य रहाणे, रिषभ पंत, आर. अश्विन, महंमद शमी, हार्दिक पंड्या, ईशांत शर्मा, जसप्रीत बुमरा.


​ ​

संबंधित बातम्या