INDvsBAN : पहिल्या सामन्यापूर्वीही टीम इंडियाचा डे-नाईट सामन्यासाठी सराव

वृत्तसंस्था
Wednesday, 13 November 2019

कोलकतामध्ये बांगलादेशविरुद्ध पहिला वहिला प्रकाशझोतातील कसोटी सामना पुढील आठवड्यात होत आहे, परंतु विद्यूत प्रकाशझोतात खेळण्याचा सराव पहिल्या कसोटी सामन्याच्या सरावातून टीम इंडिया करणार आहे. भारतीय संघ व्यवस्थापनाने मध्य प्रदेश क्रिकेट संघटनेकडे तशी मागणी केली आहे. 

इंदूर : कोलकतामध्ये बांगलादेशविरुद्ध पहिला वहिला प्रकाशझोतातील कसोटी सामना पुढील आठवड्यात होत आहे, परंतु विद्यूत प्रकाशझोतात खेळण्याचा सराव पहिल्या कसोटी सामन्याच्या सरावातून टीम इंडिया करणार आहे. भारतीय संघ व्यवस्थापनाने मध्य प्रदेश क्रिकेट संघटनेकडे तशी मागणी केली आहे. 

साजरा करूया रोहितचा `तो` वाढदिवस

कसोटी सामन्यासाठी सूर्यप्रकाशात सराव केला जातो. गुरुवारपासून होळकर स्टेडियमवर पहिला कसोटी सामना सुरु होत आहे. या सामन्यानंतर तीन दिवसानंतर प्रकाशझोतातील सामना होणार आहे. त्याच्या सरावासाठी वेळ फार कमी असल्याने टीम इंडियाने इंदूरच्या कसोटीसाठीपासूनच विद्यूत प्रकाशात सराव करणार आहे. मध्य प्रदेश क्रिकेट संघटनेकडे तशी मागणी केली आहे. 

मध्य प्रदेश क्रिकेट संघटनेचे सचिव मिलिंद कनमाडीकर यांनी भारतीय संघाने केलेल्या मागणीला दुजोरा दिला. आम्ही त्यानुसार संघासाठी व्यवस्था करणार आहोत, असे कनमाडीकर म्हणाले. 

गुलाबी चेंडूवर लवकरात लवकर सराव करण्याची आवश्‍यकता असल्याचे मत उपकर्णधार अजिंक्‍य रहाणे बीसीसीआयच्या संकेतस्थळाशी बोलताना व्यक्त केलेले आहे. या नव्या आव्हानासाठी मी फारच उत्सुक आहे. प्रत्यक्ष सामन्यात कसा खेळ होईल याबाबत आत्ताच सांगू शकत नाही, परंतु एक-दोन सराव सत्र झाल्यानंतर अंदाज येईल. प्रत्येत सतात गुलाबी चेंडू किती प्रमाणात स्वींग होतो हे सुद्धा समजून येईल. चेंडू स्वींग झाल्यानंतर खेळणे उचित ठरू शकेल, असे रहाणे म्हणतो. 

INDvsBAN : सहा गडी बाद करण्यापूर्वी चहरने नेट्समध्ये टाकलेले तब्बल एक लाख चेंडू

भारतीय संघ बांगलादेशविरुद्ध ट्‌वेन्टी-20 मालिका खेळत असताना या संघात नसलेले अजिंक्‍य रहाणे, चेतेश्‍वर पुजारा, हनुमा विहारी, ईशांत शर्मा आणि महम्मद शमी यांनी बंगळूरमधील राष्ट्रीय क्रिकेट अकदामीत काही दिवस प्रकाशझोतात गुलाबी चेंडूवर सराव केला आहे. 

गुलाबी चेंडूवर मी दुलीप करंडक स्पर्धेतील सामने खेळलेलो आहे, आता थोडासा सराव मोलाची ठरू शकेल, असे सांगताना पुजारा स्पष्ट केले की, 2016-17 च्या मोसमात मी दुलीप करंडक स्पर्धा खेळलो होतो. त्याला आता काहीसा वेळ झाला असला तरी तो अनुभव कामी येईल. 

संधीप्रकाश महत्वाचा 
गुलाबी चेंडूचा सामना करताना संधी प्रकाशात खेळणे अवघड असते. त्यासाठी सराव अत्यंत्य महत्वाचा असतो. चेंडूवर नजर बसणे गरजेचे असते काही सराव सत्रातून याचा अभ्यास होईल, असे पुजाराने सांगितले.

सगळं संपलं नाहीये, एकदिवसीय संघातही परतेन : रहाणे 

दीपक चहरची कमाल, तीन दिवसांत घेतली दुसरी हॅटट्रीक!

रोहित शर्मा आता कसोटी नीट खेळ, 'तो' परत येतोय


​ ​

संबंधित बातम्या