सिंबायोसिस सेकंडरी आणि प्रायमरी प्रशाला उपांत्य फेरीत 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 27 August 2018

शिक्षण विभाग पुणे महानगरपालिका आणि जिल्हा क्रीडा परिषद आयोजित आंतरशालेय टेबल टेनिस स्पर्धेत चौदा वर्षांखालील मुलांच्या गटातून मिलेनियम, दिल्ली पब्लिक, 
सिंबायोसिस सेकंडरी आणि प्रायमरी प्रशालेने प्रतिस्पर्ध्यांना हरवून उपांत्य फेरी गाठली. 

पुणे : शिक्षण विभाग पुणे महानगरपालिका आणि जिल्हा क्रीडा परिषद आयोजित आंतरशालेय टेबल टेनिस स्पर्धेत चौदा वर्षांखालील मुलांच्या गटातून मिलेनियम, दिल्ली पब्लिक, 
सिंबायोसिस सेकंडरी आणि प्रायमरी प्रशालेने प्रतिस्पर्ध्यांना हरवून उपांत्य फेरी गाठली. 
प्रभात रोडवरील सिंबायोसिस स्पोर्टस सेंटरच्या टेबल टेनिस हॉलमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेच्या उपांत्यपूर्व लढतीत मिलेनियम प्रशालेने एरंडवण्याच्या अभिनव विद्यालयाचा आणि सिंबायोसिस प्रायमरीने भारतीय विद्याभवन परांजपे प्रशालेचा 3-0 असा, सिंबायोसिस सेकंडरीने सेंट व्हिन्सेंटचा 3-1 असा, तर दिल्ली पब्लिकने सिटी इंटरनॅशनलचा 3-2 असा पराभव केला होता. 

निकाल असे : 
1) मिलेनियम प्रशाला - विजयी विरुद्ध अभिनव विद्यालय 3-0. नील मुळ्ये वि. वि. आयुष जायदे 11-6, 11-4, जय पेंडसे वि. वि. असीम केळकर 11-8, 11-9, मानस पाटकर वि. वि. आरुष 3-11, 13-11, 11-6, 2) दिल्ली पब्लिक प्रशाला वि. वि. सिटी इंटरनॅशनल प्रशाला 3-2. आयान चोपकर वि. वि. अमेय सातभाई 11-7, 11-8, शारव गर्ग वि. वि. मल्हार व्यवहारे 11-6, 11-6, जयंत चॅटर्जी पराभूत विरुद्ध अनिकेत सातभाई 11-9, 6-11, 11-13, शारव गर्ग पराभूत विरुद्ध अमेय सातभाई 5-11, 11-4, 11-6, आयान चोपकर वि.वि. मल्हार व्यवहारे 11-5, 11-6. 
3) सिंबायोसिस सेकंडरी प्रशाला वि. वि. सेंट व्हिन्सेंट प्रशाला 3-1. सनत जैन वि. वि. तन्मय वाणी 11-9, 11-3, प्रथमेश पायगुडे वि. वि. नील शहा 3-11, 6-11, कौस्तुभ जोशी वि. वि. हर्ष 11-4, 11-7, सनत जैन वि.वि. नील शहा 12-10, 11-2. 
4) सिंबायोसिस प्रायमरी वि. वि. भारतीय विद्याभवन परांजपे प्रशाला 3-0. वेदांग जोशी वि. वि. 
शौनक पाठक 11-4, 11-6, आर्यन इंगळे वि. वि. निशांत पाटील 11-6, 11-6, अनुज अभ्यंकर वि. वि. सुमेध शिवले 11-8, 11-5. 
 


​ ​

संबंधित बातम्या