भारताला टी-20 वर्ल्ड कप जिंकून देणारा क्रिकेटपटू करतोय हे काम

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 25 March 2020

कोरोना व्हायरससोबत सगळं जग लढा देत आहे. क्रिकेटर्स त्यांच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकाना घराबाहेर पडू नका असे अवाहन करत आहेत.

कोरोना व्हायरसशी आपला देश लढत आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांसाठी देश बंद असेल अशी घोषणा केली आहे. जगात कोरोना व्हायरसमुळे शेकडो लोक मरत आहेत सगळ्या जगात भीतीचे वातावरण आहे. अनेकांना घरातून काम करण्याची मुभा मिळाली आहे, तर बऱ्याच जणांना तर सरळ सुट्टी मिळाली आहे. पण दक्षिण आफ्रिकेत 2007  साली झालेल्या टी-20 वल्डकपमध्ये शेवटच्या ओव्हरमध्ये भारताला विजय मिळवून देणारा खेळाडू मात्र स्वत: रस्त्यांवर उतरुन त्याची ड्यूटी पुर्ण करत आहे. 

पठाण बंधूंची कोरोना ग्रस्तांना मोठी मदत, दान केले 4000 मास्क

कोरोना व्हायरससोबत सगळं जग लढा देत आहे. क्रिकेटर्स त्यांच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकाना घराबाहेर पडू नका असे अवाहन करत आहेत. तर भारताकडून क्रिकेट खेळलेला गोलंदाज जोगींदर शर्मा सध्या हरियाना पोलिस मध्ये डिएसपी पदावर कार्यरत आहे. कोरोना व्हाय़रसच्या फैलाव रोखण्यासाठी केल्या गेलेल्या लॉक डाऊन मध्ये पोलिस रस्त्यांवर उतरुन काम करत आहे. घराबाहेर पडणाऱ्यांना परत घरी पाठवण्याचे काम सध्या पोलिस करत आहेत. 

कोरोनापासून बचावासाठी विराट-अनुष्काचा खास संदेश 

जोगीदंर शर्मा याने त्याच्या ट्विटरवर वर्दीत कर्तव्य पार पाडत असतानाचे फोटो पोस्ट केले आहेत. त्या सोबत संदेशही दिला आहे. त्याने लिहीलं आहे की, 'कोरोनाला हरवण्यासाठी आपल्याकडे एकमेव मार्ग आहे. घरात थांबा, सुरक्षित राहा. कृपया आम्हाला सहकार्य करा. जय हिंद'
 


​ ​

संबंधित बातम्या