वर्ल्डकप टी-20 पुढे ढकलणे जवळपास निश्चित

टीम ई-सकाळ
Tuesday, 7 July 2020

खुल्या मैदानात ऑस्ट्रेलिया संघाचा सराव सुरू झाला आहे; पण या खेळाडूंना सप्टेंबरमधील इंग्लंडविरुद्ध मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी तयारी करा, असे सांगण्यात आल्याचे वृत्त ऑस्ट्रेलियातील टेलिग्राफ या वर्तमानपत्राने दिले आहे.

सिडनी :ऑस्ट्रेलियातील विश्वकरंडक ट्वेन्टी- 20 क्रिकेट स्पर्धा पुढे ढकलण्यात येणार, हे आता जवळपास निश्चित झाल्यातच जमा आहे. वर्ल्डकपचा विचार सोडून इंग्लंडविरुद्धच्या मालिकेची तयारी करा, अशा सूचना क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आपल्या संघाला दिल्या आहेत. खुल्या मैदानात ऑस्ट्रेलिया संघाचा सराव सुरू झाला आहे; पण या खेळाडूंना सप्टेंबरमधील इंग्लंडविरुद्ध मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी तयारी करा, असे सांगण्यात आल्याचे वृत्त ऑस्ट्रेलियातील टेलिग्राफ या वर्तमानपत्राने दिले आहे.

जाहिरातदारांमध्येच निरुत्साह...काय होणार मग आयपीएलचे?

18 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर या कालावधीत ऑस्ट्रेलियात ट्वेन्टी-20 विश्वकरंडक होणे अपेक्षित आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाही स्पर्धा पुढे ढकलण्यास आग्रही आहे; परंतु आयसीसी मात्र निर्णय लांबवत आहे. ही स्पर्धा पुढे ढकलण्यात आली, तर भारतात आयपीएलसाठी मार्ग खुला होण्याची शक्यता आहे. वर्ल्डकप स्पर्धा पुढे ढकलण्याचा निर्णय या आठवड्यात अपेक्षित आहे. त्यामुळे खेळाडूंना इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी तयारी करा, असे सांगण्यात आल्याचे या वृत्तात नमुद करण्यात आले आहे.

आयपीएलमध्ये खेळण्यास परवानगी

आयपीएलमध्ये खेळण्यास ऑस्ट्रेलिया खेळाडूंना परवानगी देणार असल्याचेही सूतोवाच या वृत्तात करण्यात आले आहे. तसे झाल्यास आयपीएलमध्ये करारबद्ध असलेले ऑस्ट्रेलियाचे खेळाडू इंग्लंडमधून थेट भारतात जातील (आयपीएल भारतात झाली तर)

- क्रिडा जगतातील  बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

मेलबर्नमध्ये रुग्णवाढ
दरम्यान, मेलबर्न या शहरात कोरोनाची दुसरी लाट येण्याची चिन्हे दिसत आहेत. दरोरोज रुग्णवाढ होत आहे. मेलबर्नमध्ये विश्वकरंडक ट्वेन्टी-20 चे अधिक सामन्यासह अंतिम सामन्याचेही नियोजन करण्यात आले होते. अशी रुग्णवाढ होत असेल, तर आयसीसीसमोरही स्पर्धा पुढे ढकलण्याशिवाय पर्याय नसेल.


​ ​

संबंधित बातम्या