स्वप्नाला बूट पुरविण्याची जबाबदारी घेतली 'या' कंपनीने

वृत्तसंस्था
Saturday, 1 September 2018

आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये हेप्टथलॉन प्रकारात सुवर्ण पदक पटकावणाऱ्या स्वप्ना बर्मनाला बुट पुरवण्याची सर्व जबाबदारी Nike कंपनीने घेतली आहे. दोन्ही पायांना जन्मत: सहा बोटे असलेल्या स्वप्नाला तिला हवे तसे बुट न मिळाल्याने अनेकवेळा अनवाणी पायांनी सराव करावा लागत असे तर आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये तिला खास बुट तयार करुन घ्यावे लागत असे.    

जकार्ता : आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये हेप्टथलॉन प्रकारात सुवर्ण पदक पटकावणाऱ्या स्वप्ना बर्मनाला बुट पुरवण्याची सर्व जबाबदारी Nike कंपनीने घेतली आहे. दोन्ही पायांना जन्मत: सहा बोटे असलेल्या स्वप्नाला तिला हवे तसे बुट न मिळाल्याने अनेकवेळा अनवाणी पायांनी सराव करावा लागत असे तर आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये तिला खास बुट तयार करुन घ्यावे लागत असे.    

मात्र जकार्तामध्ये केलेल्या सुवर्णकामगिरीनंतर चेन्नईतील इंटेग्रल कोच फॅक्टरीच्या अधिकाऱ्यांकडून Nike कंपनीला स्वप्नासाठी विशेष बुट तयार करण्यासाठी विनंती करण्यात आली आहे. 

हेप्टथलॉन प्रकारात खेळाडूला भालाफेक, तिहेरी उडी आणि शर्यत अशा विविध प्रकारांमध्ये सहभाग घ्यावा लागतो. या सर्व प्रकारांसाठी खेळाडूकडे चांगल्या दर्जाचे किमान 5 बुट असणे आवश्यक असते. मात्र स्वप्नाच्या दोन्ही पायांना सहा बोटे असल्याने तिला तिच्या मापाचे बुट मिळत नव्हते. 
मात्र Nike कंपनीने पुढाकार घेतल्यामुळे तिची चिंता आता मिटण्याची शक्यता आहे.


​ ​

संबंधित बातम्या