स्वप्ना बर्मन बंगाल सरकारची नोकरी नाकारणार? 

वृत्तसंस्था
Saturday, 8 September 2018

कोलकाता : आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकलेल्या स्वप्ना बर्मन हिला पश्‍चिम बंगाल सरकारने 10 लाख रुपये, तसेच नोकरी देण्याची तयारी दाखवली; पण स्वप्ना ही नोकरी नाकारण्याचीच शक्‍यता आहे. 

कोलकाता : आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकलेल्या स्वप्ना बर्मन हिला पश्‍चिम बंगाल सरकारने 10 लाख रुपये, तसेच नोकरी देण्याची तयारी दाखवली; पण स्वप्ना ही नोकरी नाकारण्याचीच शक्‍यता आहे. 

हरियाना सरकार सुवर्णपदक विजेत्यांना तीन कोटी देत असताना बंगाल सरकार 10 लाखच देते, अशी टीका सुरू आहे. त्यातच द्युती चंदला ओडिशा सरकारने तीन कोटी देणार असल्याचे जाहीर केल्यावर ममतांवरील टीका वाढली आहे. आता स्वप्नाने बंगाल सरकारने देऊ केलेली नोकरी नाकारण्याचे संकेत दिल्यामुळे टीकेची धार वाढण्याची शक्‍यता आहे. त्यातच स्वप्नाने आपल्याला भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या परिसरात घर देण्याची मागणी केली आहे. 

बंगाल सरकारने मला तसेच भावाला नोकरी देण्याचे आश्वासन दिले आहे. मला नोकरीच्या अनेक ऑफर येत आहेत. त्याबाबत मी अजून कोणताही निर्णय घेतलेला नाही, असे स्वप्नाने सांगितले. ती म्हणाली, ""सॉल्ट लेक येथील भारतीय क्रीडा प्राधिकरण केंद्राजवळ घर असावे, अशी माझी इच्छा आहे. माझा मुक्काम तिथेच असतो; पण तिथे माझा सराव नसेल, तर मला जवळपास राहायला जागा नाही.'' सरकारने त्याच्याजवळ घर दिले, तर खूपच चांगले होईल, असेही ती म्हणाली. 

शस्त्रक्रिया होण्याची शक्‍यता 
स्वप्नाच्या सध्या अनेक वैद्यकीय चाचण्या सुरू आहेत. तिला पाठदुखीने आशियाई क्रीडा स्पर्धेच्यावेळी जास्तच सतावले होते. हा त्रास तिला 2017 च्या आशियाई ऍथलेटिक्‍स स्पर्धेपासून होत आहे. आता तातडीने उपाय आवश्‍यक आहेत; अन्यथा ती धावूच शकणार नाही, असे स्वप्नाच्या मार्गदर्शकांनी सांगितले. यामुळे ती पुढील वर्षी महत्त्वाच्या स्पर्धेच्यावेळी ब्रेकच घेण्याची शक्‍यता आहे. सुरवातीस तिच्या दातावर उपचार होतील. त्यानंतर पाठीवरील शस्त्रक्रियेबाबत निर्णय होणार आहे. 


​ ​

संबंधित बातम्या