Asian Games 2018 : सुशीलकुमारचा पहिल्याच फेरीत पराभव

वृत्तसंस्था
Sunday, 19 August 2018

ऑलिम्पिकमध्ये दोन वेळा पदक पटकावलेला भारताचा कुस्तीपटू सुशीलकुमारचा आशियाई स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत पराभव झाला आहे. बहारिनच्या अॅडम बॅटीरोव्ह याने 74 किलो वजनाच्या फ्रिस्टाईल प्रकारात सुशीलकुमारचा 3-5 असा पराभव केला. 

जकार्ता : ऑलिम्पिकमध्ये दोन वेळा पदक पटकावलेला भारताचा कुस्तीपटू सुशीलकुमारचा आशियाई स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत पराभव झाला आहे. बहारिनच्या अॅडम बॅटीरोव्ह याने 74 किलो वजनाच्या फ्रिस्टाईल प्रकारात सुशीलकुमारचा 3-5 असा पराभव केला. 

सामन्याच्या सुरवातीला आघाडी घेऊनही सुशीलकुमार नंतर मागे पडला. त्याच्या गुडघ्यामुळे तो संपूर्ण सामनाभर अस्वस्थ वाटत होता. त्यासा आजवर एकदाही आशियाई स्पर्धांमध्ये सुवर्ण पदक जिंकता आलेले नाही. 2006मध्ये दोहामध्ये झालेल्या आशियाई स्पर्धेत त्याने शेवटचे ब्रॉंझ पदक पटकावले होते. सुशीलकुमारला यावेळी ब्रॉंझ पदक जिंकण्याच्या संधी आहेत मात्र त्यासाठी बहारिनच्या बॅटीरोव्हला अंतिम फेरी गाठणे गरजेचे आहे. 

सुशीलकुमारने या वर्षी गोल्ड कोस्ट स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावले होते. आशियाई स्पर्धेपूर्वी घेण्यात आलेल्या चाचणीतही त्याने सहभाग घेतला नव्हता. चाचणीत सहभागी होण्याऐवजी तो जॉर्जियामध्ये सराव करत होता.     

आशियाई स्पर्धेच्या पहिल्या दिवशी 57 किलो वजनी गटात भारताच्या संदीप तोमरने तुर्कमेनिस्तानच्या नझरोव्ह रुस्तमचा 12-8 असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. तसेच 65 किलो वजनी गटात भारताच्या बजरंग पुनिया याने उझबेकिस्तानच्या खासनोव्ह सिरोज्जिदिन याचा 13-3 असा पराभव केला. 

 

संबंधित बातम्या