सुशांतच्या आयुष्यातील ते अधुरं स्वप्रं धोनीमुळं झालं पूर्ण!

टीम ई-सकाळ
Monday, 15 June 2020

बॉलिवूडमध्ये आपली छाप सोडलेल्या अभिनेत्याला खरं तर क्रिकेटचे मैदान गाजवण्याची इच्छा होती. सुशांतने खुद्द एका मुलाखतीमध्ये आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या होत्या.

मुंबई :  छोट्या पडद्यावरील अभिनयाने घराघरात पोहचलेला आणि धोनीची व्यक्तीरेखा साकारून मनामनात बसलेल्या सुशांत सिंह राजपूतनं आत्महत्या करत आपलं आयुष्य संपवलं. आपल्या अभिनयाने लाखो चाहत्यांना भूरळ घालणाऱ्या अभिनेत्याने तणावातून हे टोकाचे पाउल उचलल्याचे बोलले जात आहे. त्याला नेमकं कसल टेन्शन होते, याचा त्याच्या चाहत्यांना राहून राहून प्रश्न नक्कीच सतावत असेल. कदाचित या प्रश्नाचं ठाम उत्तर मिळणारही नाही. पण त्याचं अचानक आणि अशा पद्धतीनं निघून जाण त्याचा चाहता कधीच विसरणार नाही. 

जाणून घ्या सुशात सिंहचा 'पवित्र रिश्ता' ते 'छिछोरे पर्यंतचा जीवनपट 

बॉलिवूडमध्ये आपली छाप सोडलेल्या अभिनेत्याला खरं तर क्रिकेटचे मैदान गाजवण्याची इच्छा होती. सुशांतने खुद्द एका मुलाखतीमध्ये आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या होत्या. क्रिकेटच्या वेडाबद्दल बोलतान तो म्हणाला होता की, लहानपनी भारतीय संघाचे सामने कधी आहेत याची खास टिपण्णी ठेवायचो. भारत-पाकिस्तान यांच्यातील सामना असेल त्यादिवशी संपूर्ण वेळ त्या सामन्यासाठी असायचा असेही त्याने सांगितले होते.  

बेसब्रियां...

क्रिकेटचे तुफान वेड असलेल्या सुशांतला क्रिकेटमध्ये रस असताना क्रिकेटच्या मैदानात चमकण्याऐवजी बॉलिवूडच्या मैदानात झळकण्याचे भाग्य त्याला लाभले. या क्षेत्रात भारतीय संघाचा कूल आणि यशस्वी कर्णधार महेंद्र धोनीच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात सुशांतने मुख्य भूमिका बजावली. या चित्रपटात त्याने धोनीची हुबेहुब केलेली नक्कलही त्याच्यातील अभिनयाची चुणूक दाखवणारी अशीच होती. याच चित्रपटात तो आपलं क्रिकेट होण्याचं स्वप्नही जगला. या चित्रपटाने त्याला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. 'एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी' या चित्रपटातील त्याची भूमिका अविस्मरणीय आहे आणि राहिलं. 

बॉलिवूडमध्ये जीवघेण्या स्पर्धेत जीव गुदमरतोय!

सुशांत सिंहला भारतीय क्रिकेट संघाचे प्रतिनिधीत्व करायचे होते. पण तो घरातील सर्वात छोटा आणि एकुलता एक मुलगा असल्यामुळे त्याने क्रिकेटध्ये कारकिर्द करण्याची जोखीम घेतली नाही. चित्रपटाच्या माध्यमातून एका अर्थाने तो आपण पाहिलेले स्वप्न जगला आणि ते जिवंत राहिल अशी कामगिरीही त्याने केली. 


​ ​

संबंधित बातम्या