'बॉलीवूडसारखी घराणेशाही क्रिकेटमध्ये नाही ...'

शैलेश नागवेकर
Saturday, 27 June 2020

सुशांत आत्महत्येच्या निमित्ताने क्रिकेटमधील घराणेशाहीमध्ये डोकावले गेले नसते तर नवलच  भारताचा माजी सलामीवीर आणि प्रसिद्ध समालोचक आकाश चोप्राने भारतीय क्रिकेटमध्ये घराणेशाही नसल्याचे सांगताना "गावसकर' आणि "तेंडुलकर' या दोन आडनावांचा उल्लेख केला.

मुंबई : अभिनेता सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलीवूडमध्ये घराणेशाही टार्गेट झाली. चहुबाजूंनी आवाज उठू लागले आणि चित्रपटांच्या सामान्य प्रेक्षकांच्याही काळजाला हा विषय भिडला. घराणेशाही हा विषय मुळात तसा नवा नाही. राजकारणात अनेकदा हा शब्द वारंवाद कानावर पडत असतो, पण खेळाच्या विचार करता आणि भारतात लोकप्रिय असलेल्या क्रिकेटचा विचार करता घराणेशाहीचा वाद कधी झालेला नाही...अर्थात सुशांत आत्महत्येच्या निमित्ताने क्रिकेटमधील घराणेशाहीमध्ये डोकावले गेले नसते तर नवलच  भारताचा माजी सलामीवीर आणि प्रसिद्ध समालोचक आकाश चोप्राने भारतीय क्रिकेटमध्ये घराणेशाही नसल्याचे सांगताना "गावसकर' आणि "तेंडुलकर' या दोन आडनावांचा उल्लेख केला. सचिनचा मुलगा अर्जूनही क्रिकेट खेळतो. मुंबईच्या विविध वयोगटातील संघात त्याची निवड झालेली आहे. एवढेच काय पण गतवर्षी झालेल्या मुंबई ट्‌वेन्टी-20 लीगमध्ये अर्जूनला सर्वाधिक भाव मिळाला होता, पण अर्जूनच्या या वाटचातील सचिनच्या वशिलेबाजीचा काडीमात्र संबंध नाही, असे चोप्रा म्हणतो. 

क्रिकेटचा धर्मग्रंथ सचिनला विसरला!

अर्जून हा अष्टपैलू खेळाडू आहे. डावखुरी वेगवान गोलंदाजी ही त्याची खासियत आहे. अर्थात सचिनचा मुलगा म्हणून त्याला भारतीय संघाच्या नेटमध्ये गोलंदाजी करण्याची संधी काही वेळा मिळालेली आहे. मुळात कोणत्याही राष्ट्रीय संघाच्या सरावासाठी नेटमध्ये स्थानिक गोलंदाज लागतातच त्यात गैर नाही, एवढेच नव्हे तर मुंबई इंडियन्सच्या नेटमध्येही काहीवेळा अर्जूनने गोलंदाजी केली आहे. पण सचिन मुंबई इंडियन्सचा मेंटॉर असूनही अर्जूनला करार मिळालेला नाही, हे चोप्रा आवर्जून सांगतो. गतवर्षी इंग्लंड संघाच्या नेटमध्येही अर्जून सरावाचा गोलंदाज म्हणून सहभीा झाला होता. त्याचा एक चेंडू बेअरस्टॉच्या बुटाला लागला त्यामुळे जायबंजी झाल्याने त्याला कसोटी सामन्यास मुकावे लागले होते. 2017 मध्ये महिलांच्या विश्‍वकरंडक स्पर्धेसाठी तयारी करणाऱ्या भारतीय महिला संघाला नेटमध्ये अर्जूनने गोलंदाजी केली. याचाच अर्थ अर्जून मेहनत घेत आहे. पण कोठेही सचिनने वशिला लावलेला नाही, असे चोप्राने सांगितले. 

आंतरराष्ट्रीय पुनरागमनात क्रिकेट दोन पावले पुढे वाचा कसे आणि कुठे?

सुनील गावसकर यांचा मुलगा रोहन गावसकर याचेही उदाहर चोप्राने दिले. रोहन गावसकर काही एकदिवसीय सामने भारताकडून खेळला, पण त्याची कारकिर्द मर्यादितच राहिली. देशांतर्गत क्रिकेटमध्ये केलेल्या कामगिरीमुळे रोहनला भारतीय संघात स्थान मिळाले होते. असे सांगताना चोप्रा पुढे म्हणाला, खर तर सुनील गावसकर हे कट्टर मुंबईकर पण रोहन मुंबईतून नव्हे तर बंगाल संघातून रणजी क्रिकेट खेळला. त्यावेळी मुंबई संघ एवढा भक्कम होता की रोहनला संघात जागा मिळत नव्हती. वास्तविक गावसकर त्यावेळी मुंबई संघासाठी वशिला लावू शकले असते.... 
या दोन उदाहरणावरून भारतीय क्रिकेटमध्ये घराणेशाही नसल्याचा चोप्राने पुनरुच्चार केला.


​ ​

संबंधित बातम्या