सुशांतला दिलेलं ते वचन अधूरंच राहिलं, मुंबईकर क्रिकेटर झाला भावूक

टीम ई-सकाळ
Wednesday, 17 June 2020

सुशांतच्या धक्कादायक निधनाच्या घटनेवर प्रतिक्रिया देताना दिग्विजय देशमुख म्हणाला की,  तो एक उत्तम क्रिकेटर होता. त्याच्यासोबत काम करत असताना शुटिंगच्या अखेरच्या दिवशी मी त्याला एक वचन दिले होते.

मुंबई : बॉलिवूडमधील आपल्या अभिनयाने घायाळ करणाऱ्या सुशांत सिंह राजपूत आपल्या चाहत्यांना सोडून कायमचा निघून गेला. सुशांतने नैराशातून आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. त्याने घेतलेल्या टोकाच्या निर्णयामुळे बॉलिवूडच नव्हे तर क्रिडा क्षेत्रातील मंडळीही हळहळ व्यक्त करत आहे. अभिनयासोबत त्याच्यात एक उत्तम खेळाडू दडलेला होता. 'एमएस धोनी द अनटोल्ड स्टोरी' या चित्रपटाच्या माध्यमातून त्याचं क्रिकेटप्रेम सर्वांसमोर आलं होते. क्रिकेटची आवड असल्यामुळे अनेक क्रिडा क्षेत्रातील मंडळींच्या तो सानिध्यात असायचा. 2013 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'कोई पो चे' या चित्रपटात सुशांत सिंह राजपूतने दिग्विजय देशमुखच्या मेंटरची भूमिका साकारली होती. या चित्रपटातील कलाकार आणि सध्याच्या घडीला मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात सामील झालेल्या दिग्विजयने सुशांतच्या जाण्याने आतीव दु:ख झाल्याची भावना व्यक्त केली आहे. एवढेच नाही तर सुशांत सिंहला दिलेले वचन पाळू शकलो नाही, याची खंत कायम राहिल अशा शब्दांत त्याने सुशांतसोबतच्या आठवणींना उजाळा दिलाय.   

सुशांतच्या आयुष्यातील ते अधूरं स्वप्न धोनीमुंळ झालं पूर्ण!    

सुशांतच्या धक्कादायक निधनाच्या घटनेवर प्रतिक्रिया देताना दिग्विजय देशमुख म्हणाला की,  तो एक उत्तम क्रिकेटर होता. त्याच्यासोबत काम करत असताना शुटिंगच्या अखेरच्या दिवशी मी त्याला एक वचन दिले होते. मी एक चांगला क्रिकेट होईपर्यंत तुम्हाला भेटत राहिनं सुशांत यांना म्हटले होते. यावर्षीच्या आयपीएलसाठी माझी मुंबई इंडियन्स संघात निवड झाली. त्यानंतर मी सुशांतला भेटायचे ठरवले होते. मात्र लॉकडाउनमुळे त्याची भेट लांबणीवर पडली. आता ते आपल्यात नाहीत. आयपीएल 2020 च्या लिलावात महाराष्ट्राकडून खेळणाऱ्या दिग्विजय देशमुखला मुंबई इंडियन्सने  20 लाख रुपयेला खरेदी करत आपल्या ताफ्यात सामील केले आहे. 

धोनी फेम सुशांतची अनडोल्ड एक्झिट...

दिग्विजय देशमुख भावनिक होत पुढे म्हणाला की, जर लॉकडाउन नसते तर आमची भेट झाली असती. मी भेटीचे वचन पूर्ण करु शकलो असतो. पण आता हे वचन अधूरंच राहिलं. 22 वर्षीय पुणेकर दिग्विजयने 'एमएस धोनी-अनटोल्ड स्टोरी' चित्रपटाच्या शूटिंग आवर्जून पाहिल्याची आठवणही सांगितली. त्यानंतर एकाच शहरात असून आम्ही भेटलो नाही याची खंत कायम सलत राहिलं, असेही दिग्विजयने म्हटले आहे.  दिग्वजयने वयाच्या 15 व्या वर्षी 'काई पो चे' या चित्रपटात सुशांत सिंह राजपूत याच्यासोबत काम केले होते. चित्रपटासाठी सुशांत खूप मेहनत घ्यायचा. तो टीममधील मंडळींसोबत मैत्रीपूर्ण व्यवहार ठेवायचा, अशा आठवणींनाही दिग्वजयने उजाळा दिला.  


​ ​

संबंधित बातम्या