भारतीय युवा जोश अन् अनुभवी गड्याची एकत्र नेट प्रॅक्टिस; पाहा व्हिडिओ

सुशांत जाधव
Tuesday, 14 July 2020

लॉकडाउनमधून शिथिलता मिळाल्यानंतर अनेक क्रिकेटर्स हळूहळू घराबाहेर पडून नेटमध्ये सराव करताना दिसत आहेत.   

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे खेळाची मैदाने ओस पडली आहेत. इंग्लंडच्या मैदानातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटला सुरुवात झाली असली तरी भारतीय क्रिकेट चाहत्यांना अजूनही आपल्या आवडत्या क्रिकेटर्सची फटकेबाजी पाहण्यासाठी प्रतिक्षा करावी लागणार आहे. आयपीएल आणि टी-20 विश्वचषक स्पर्धेतील संभ्रम कायम असताना वर्षाखेरिस होणारा भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा निश्चित असल्याचा विश्वास बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी बोलून दाखवला आहे. दरम्यान लॉकडाउनमधून शिथिलता मिळाल्यानंतर अनेक क्रिकेटर्स हळूहळू घराबाहेर पडून नेटमध्ये सराव करताना दिसत आहेत.   

वेस्ट इंडिजच्या संघर्षमय विजयाने क्रिकेटमध्ये आली जान

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Suresh Raina (@sureshraina3) on

सुरेश रैना लॉकडाउनच्या दरम्यान मिळालेला वेळ हा नेट प्रक्टिसमध्ये घालवताना दिसतोय. सोशल मीडियाच्या माध्यमातून तो यासंदर्भातील व्हिडिओ देखील चाहत्यांसाठी शेअर करत आहे. रैनासोबत भारतीय संघातील युवा यष्टीरक्षक ऋषभ पंत देखील सरावात सहभागी झाल्याचे पाहायला मिळते. रैन बऱ्याच दिवसांपासून भारतीय संघाबाहेर आहे. लॉकडाउनच्या काळात त्याने घेतलेल्या मेहनतीचे फळ मिळणार का? हे येणाऱ्या काळातच कळेल. तो चेन्नई सुपर किंग्जंच्या ट्रेनिंग कॅम्पमध्येही सहभागी होता. पण देशातील कोरोना विषाणूच्या प्रादुरभावामुळे ट्रेनिंग कॅम्प स्थगित करण्यात आले. आयपीएल स्पर्धाही अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली आहे.  

क्रीडा संघटनांतही कसे असणार तीस टक्के महिला राज?

यापूर्वी देखील  सुरेश रैनाने दोवेळा  शेअर केलेल्या  प्रॅक्टिस सेशनमधील व्हिडिओमध्ये ऋषभ पंत दिसला होता. अनुभवी रैनासोबतचे प्रॅक्टिस हे युवा पंतसाठी आपल्या फलंदाजीत सुधारणा करण्यासाठी महत्त्वपूर्णच ठरेल. धोनीचा वारसदार म्हणून पंतचा चांगलाच गाजावाजा झाला. पण फ्लॉप शोनंतर त्याच्यावर टीकाही झाल्याचे पाहायला मिळाले. रैनाचा अनुभव त्याच्या किती कामी येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. 


​ ​

संबंधित बातम्या