'निवृत्तीच्या घोषनेनंतर दोघे गळ्यात-गळा घालून खूप रडलो'

सुशांत जाधव
Monday, 17 August 2020

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील निवृत्तीनंतर दोघे ब्लू जर्सीत दिसणार नसले तरी यलो जर्सीत ते मैदानात उतरल्याचेही पाहायला मिळणार आहे.

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी यांनी स्वातंत्र्य दिनी निवृत्तीच्या चर्चेला पूर्ण विराम दिला. 7 वाजून 29 मिनिटांपासन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होत आहे समजा, असे संदेश सोशल मीडियाच्या माध्यमातून देत धोनीने निवृत्तीची घोषणा केली. आयपीएलच्या सुरुवातीलाच धोनीने चाहत्यांना धक्का दिला. धोनीच्या निवृत्तीवर सोशल मीडियावर प्रतिक्रिया उमटत असताना रैनानेही धोनीच्या पावलावर पाऊल टाकत आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केलं. 

CPL2020 : कॅरेबियन लीगमध्ये धावांची 'बरसात' करणारे आघाडीचे 5 फलंदाज!

रैना म्हणाला की, ' निवृत्तीची घोषणा केल्यानंतर एकमेकांच्या गळा भेट घेत आम्ही दोघही खूप रडलो.पीयूष, अंबाती रायुडू, केदार जाधव आणि करन शर्मासोब एकत्र बसून कारकिर्दीसह मैत्रीसंदर्भात चर्चा केली. त्या रात्री आम्ही पार्टी देखील केली, असेही रैनाने सांगितले.  धोनी-रैना ही जोडी आयपीएलमधील चेन्नई सुपर किंग्जच्या संघात एकत्रित खेळताना पाहायला मिळाले आहे.

CPL2020 : कॅरेबियन लीगमध्ये चेन्नई सुपर किंग्जच्या गड्याचा बोलबाला

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील निवृत्तीनंतर दोघे ब्लू जर्सीत दिसणार नसले तरी यलो जर्सीत ते मैदानात उतरल्याचेही दिसणार आहेत. या दोघांमध्ये मैत्रीचे किस्से चांगलेच चर्चेत असतात. एका पाठोपाठ निवृत्तीनंतरही त्यांच्या मैत्रीची पुन्हा एकदा चर्चा रंगल्याचे पाहायला मिळाले. सध्याच्या घडीला आयपीएलसाठी युएईला रवाना होण्यासाठी CSK मधील सर्व खेळाडू चेन्नईमध्ये एकत्रित आहेत. चेन्नईमध्ये दाखल झाल्यानंतर धोनी-रैना यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याची माहिती दिली. निवृत्तीची घोषणा केल्यानंतर धोनीची गळा भेट घेतली. आम्हाला दोघांनाही अश्रू अनावर झाल्याचे रैनाने सांगितले.    

 


​ ​

संबंधित बातम्या