सुपर ओव्हर टाय झाल्यास आता.. नियमात झाला हा मोठा बदल!

वृत्तसंस्था
Tuesday, 24 September 2019

जुलै महिन्यात झालेल्या विश्वकरंडकाच्या अंतिम सामन्यात इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्याचा निकाल चांगलाच वादग्रस्त ठरला. त्यामुळेच आता सुपर ओव्हरच्या नियमांमध्ये मोठा बदल केला गेला आहे. ऑस्ट्रेलियाच्या बिग बॅश लीग स्पर्धेत हा नवा नियम सुरु करण्यात आला आहे. 

सिडनी : जुलै महिन्यात झालेल्या विश्वकरंडकाच्या अंतिम सामन्यात इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्याचा निकाल चांगलाच वादग्रस्त ठरला. त्यामुळेच आता सुपर ओव्हरच्या नियमांमध्ये मोठा बदल केला गेला आहे. ऑस्ट्रेलियाच्या बिग बॅश लीग स्पर्धेत हा नवा नियम सुरु करण्यात आला आहे. 

सिंधूला वर्ल्ड चॅम्पियन बनविणाऱ्या प्रशिक्षकानं अर्ध्यातच सोडली साथ

इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील मूळा सामना बरोबरीत सुटल्याने निकाल लावण्यासाठी सुपर ओव्हर खेळविली गेली. मात्र, या सुपर ओव्हरमध्येसुद्धा दोन्ही संघांच्या समानच धावा झाल्याने चौकारांच्या जास्त संख्येवर निकाल लावण्यात आला आणि इंग्लंड विश्वविजेते झाले. त्यानंतर मात्र, चौकारांच्या संख्येवर विजेते ठरवणे या निकषावर सर्वस्तरातून प्रचंड टीका करण्यात आली. मात्र, आता हा नियम बदलण्यात आला आहे. 

बीग बॅश लीगमध्ये एक सुपर ओव्हर अनिर्णित राहिल्यास किंवा समान धावा झाल्यास पुन्हा सुपर ओव्हर खेळवण्यात येणार असल्याचा नवा नियम बनवण्यात आला आहे. जोपर्यंत सामन्याचा निकाल लागत नाही तो पर्यंत सुपर ओव्हर खेळविण्याचा नियम सुरु करण्यात आला आहे. 

ENGvsNZ : ऍशेसचा धसका; इंग्लंडने संघात केले 'हे' धक्कादायक बदल

ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाने या नव्या नियमाबाबत मंगळवारी माहिती दिली. 
''सामना बरोबरीत सुटला तर सुपर ओव्हर घेण्यात येईल. मात्र, ती सुपर ओव्हरसुद्धा अनिर्णित राहिली तर आणखी एक सुपर ओव्हर घेण्यात येईल. विजेता ठरेपर्यंत  सुपर ओव्हर खेळविण्यात येतील,'' असे ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाने स्पष्ट केले. 

पुरूष आणि महिला अशा दोनही बिग बॅश लीग स्पर्धांमध्ये हा नियम लागू करण्यात येणार आहे. मात्र साखळी सामन्यात सुपर ओव्हर अनिर्णित राहिल्यास दोन संघांना गुण विभागून दिले जातील, असेही सांगण्यात आले आहे.


​ ​

संबंधित बातम्या