सनरायसर्स हैदराबादने कोरोनाबाधितांसाठी दिला 10 कोटींचा निधी

सकाळ वृत्तसेवा
Friday, 10 April 2020

यावर्षींची आयपीएल स्पर्धा 15 एप्रिल पर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.

देशात कोरोनाचे संकट वाढत आहे, कोरोना रुग्णांची सांख्या दिवसेंदिवस वाढत जात आहे. जगभरातील सर्व क्रीडा स्पर्धा रद्द करण्यात आल्या असून त्यामुळे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. यावर्षींची आयपीएल स्पर्धा देखील 15 एप्रिल पर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे आयपीएल स्पर्धा खेळणाऱ्या संघांचे देखील मोठे नुकसान झाले  आहे. तरी सनरायजर्स हैदराबाद या संघाकडून कोरोनाविरोधातील मदतकार्यास दहा कोटींची मदत केली आहे.

'नव्या पिढीला कसोटी क्रिकेटमध्ये रस नाही'

सन टिव्ही ग्रूपकडून करण्यात आलेल्या ट्विटमधून ही माहिती देण्यात आली आहे. त्यानंतर संघाचा कर्णधार ऑस्ट्रेलियाचा डेव्हिड वॉर्नर याने या बदतीबद्दल सनरायजर्स ग्रूपची प्रशंसा करत ट्विट केले आहे. 2016 साली सन रायदर्स हैद्राबादने डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वाखाली आयपीएल जिंकले होते. तर 2018 साली हैद्राबादचा संघ अंतीम सामन्यामध्ये चेन्नई सुपरकिंग्स या धोनीच्या संघाकडून पराभूत झाला होता.

 

/p>

 

 

यावर्षीचे आयपीएल 29 मार्च पासून सुरु होणार होते पण कोरोना व्हायरसचा वाढता धोका पाहता, खेळाडू आणि प्रेक्षक या सगळ्यांच्या आरोग्याचा विचार करत बीसीसीआयने आयपीएल पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. आता आयपीएल स्पर्धा 15 एप्रिलपर्यंत स्थगीत करण्यात आले आहे. 

 


​ ​

संबंधित बातम्या