संघ व्यवस्थापनाला मध्ये मध्ये करु देणार नाही : सुनील जोशी

वृत्तसंस्था
Friday, 6 March 2020

सध्या निवड समिती आणि संघ व्यवस्थापनाला आपली सर्वात प्राथमिकता राहील असे भारतीय वरिष्ठ गटाच्या क्रिकेट निवड समितीचे नवनिर्वाचीत अध्यक्ष सुनील जोशी यांनी नमूद केले.

सध्या निवड समिती आणि संघ व्यवस्थापनाला आपली सर्वात प्राथमिकता राहील असे भारतीय वरिष्ठ गटाच्या क्रिकेट निवड समितीचे नवनिर्वाचीत अध्यक्ष सुनील जोशी यांनी नमूद केले. संघ व्यवस्थापन म्हणजेच रवी शास्त्री यांची टीम आणि कर्धार विराट कोहली आणि निवड समिती यांच्यामध्ये कोणताही भेदभाव न ठेवण्याचे महत्वाचे काम आहे. 

मुलाखतीसाठी बोलावलं नाही तरी अजित आगरकरही निवड समितीत असेल, बघा कसं

अखिल भारतीय वरिष्ठ गटाच्या क्रिकेट निवड समितीत मुख्य निवडक म्हणून सुनील जोशी आणि हरविंदर सिंग यांची भूमिका महत्वाची ठरणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) बुधवारी तीन सदस्यीय क्रिकेट सल्लागार समितीच्या (सीएसी) नावांची शिफारस केली.

मदनलाल, आरपी सिंग आणि सुलक्षणा नाईक यांचा समावेश असलेल्या सीएसीने वरिष्ठ पुरुष निवड समितीच्या अध्यक्षपदी माजी भारतीय फिरकीपटू जोशी यांच्या नावाची शिफारस केली. बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी यापूर्वीच नवी निवड समिती 12 मार्चपासून दक्षिण आफ्रिकेविरूद्ध आगामी मालिकेसाठी भारताची एकदिवसीय संघ निवडेल असे जाहीर केले आहे. 

आधी राष्ट्रीय करारातून माघार घेतली अन् आता कर्णधारपदावर सोडले पाणी

निवर्तमान मुख्य निवडकर्ता प्रसाद आणि सहकारी समितीचे सदस्य गगन खोडा यांनी तयार केलेल्या रिक्त जागा भरण्यासाठी राजेश चौहान, हरविंदर, व्यंकटेश प्रसाद, लक्ष्मण शिवरामकृष्णन आणि जोशी यांच्या मुलाखती घेण्यात आल्या. त्यातून जोशी यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला. दरम्यान, जोशी यांनी भारतासाठी सन 1996 ते 2001 दरम्यान 15 कसोटी आणि 69 एकदिवसीय सामने खेळले आहेत.

दुखापतीतून परतलाय, संघात स्थान मिळायच्या आधीच धवनने तोडला BCCIचा हा नियम

कर्नाटकचा माजी डावखुरा फिरकी गोलंदाज, ज्यांनी गेल्या दोन वर्षांत बांगलादेश आणि अमेरिकेबरोबर फिरकी गोलंदाजी सल्लागार म्हणून आपली भुमिका बजावली. सीएसी सदस्यांनी माझ्यावर विश्वास टाकल्याने मी त्यांचा आभारी असल्याचे जोशी यांनी नमूद करुन आगामी काळात बरीच आव्हाने असली तरी भारतीय क्रिकेटच्या प्रगतीसाठी संघ व्यवस्थापन आणि समिती सदस्यांसोबत मी माझ्या क्षमतेनुसार सर्वतोपरी प्रयत्न करीन अशी ग्वाही दिली.


​ ​

संबंधित बातम्या