सुरक्षा रक्षक सामना फुकट पाहण्यासाठी? गावसकर भडकले

वृत्तसंस्था
Saturday, 12 October 2019

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत सलग दुसऱ्या कसोटीत आणि एकूण तिसऱ्यांदा अतिउत्साही चाहत्याने घुसखोरी केली. या पार्श्वभूमीवर माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी परखड प्रश्न उपस्थित केला.

पुणे : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत सलग दुसऱ्या कसोटीत आणि एकूण तिसऱ्यांदा अतिउत्साही चाहत्याने घुसखोरी केली. या पार्श्वभूमीवर माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी परखड प्रश्न उपस्थित केला. सुरक्षा रक्षक सामना फुकट पाहायला असतात का असे विचारत त्यांनी भारतात ही समस्या बारमाही असल्याचे नमूद केले.

Image may contain: 2 people, people smiling, outdoor

हा प्रकार घडला तेव्हा गावसकर समालोचन करीत होते. त्यांनी सांगितले की, हा सुरक्षेचा गंभीर प्रश्न आहे. हा मुद्दा काही एखादा चाहता एखाद्या क्रिकेटपटूला भेटण्यापुरता मर्यादीत नाही. मैदानावर कुणीही प्रवेश करता कामा नये याची दक्षता त्यांनी (संयोजक संघटना) घ्यायला हवी. अखेरीस काहीही घडू शकते. धोका का पत्करायचा ? मैदानाच्या आतमध्ये प्रवेश प्रवेश करणे सोपे नसते. असे असेल तर मग ती मंडळी (सुरक्षा रक्षक) काय करीत होती ?

Image may contain: one or more people and outdoor

याआधी विशाखापट्टणमलाही एका अतिउत्साही चाहत्याने घुसखोरी करीत विराट कोहलीशी हस्तांदोलन करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर त्याने मैदानावरील भारतीय क्रिकेटपटूंसह सेल्फी घेण्याचाही प्रयत्न केला होता.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

A fan invaded into ground during today's play to meet @virat.kohli Another day, another devotee

A post shared by BleedKohlism2.0 (@bleedingkohlism) on

मोहालीतील दुसऱ्या टी20 लढतीमध्येही दोन वेळा घुसखोर चाहत्यांमुळे व्यत्यय आला होता.
 


​ ​

संबंधित बातम्या