पुजाराला पवित्रा बदलण्यास सांगणे चुकीचे

वृत्तसंस्था
Sunday, 19 August 2018

तू फलंदाजी करत असताना धावांची गती कमी होते, असे कदाचित पुजाराला सांगण्यात आलेले असल्यामुळे तो द्विधामनस्थितीत असावा आणि त्याच विचारात तो हूक करण्याच्या प्रयत्नात बाद झाला. तो त्याचा नैसर्गिक फटका नव्हता. चार हजारांहून अधिक धावा करणाऱ्या फलंदाजाला जर पवित्रा बदलण्यास सांगण्यात आले तर असेच घडत असते.

खेळपट्टीचे स्वरूप पाहता नाणेफेक गमावणे आणि त्यानंतर प्रथम फलंदाजी करायला मिळणे भारताचे सुदैवच म्हणावे लागेल. चौथ्या डावात फलंदाजी करणे सोपे नसते. चेंडू फिरक घेण्याची शक्‍यता आहे. अशा स्थितीत अर्धशतकी सलामी मिळणे हेसुद्धा महत्त्वाचे आहे.

नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय योग्य होता का? हा विचार आता ज्यो रूट आणि त्याचे सहकारी करत असतील. धवन आणि राहुल यांनी उजव्या यष्टीबाहेर जाणाऱ्या चेंडूंचा मार्ग सोडला आणि शरीराच्या जवळ जास्तीत जास्त खेळण्याचा प्रयत्न केला. उजव्या यष्टीबाहेर असलेल्या चेंडूच्या प्रलोभनात ते अडकले नाहीत; परंतु पुढच्या तासात ख्रिस वोक्‍सने धवनला चांगल्या चेंडूवर बाद केले आणि पुढच्या षटकात राहुललाही माघारी धाडले. 

तू फलंदाजी करत असताना धावांची गती कमी होते, असे कदाचित पुजाराला सांगण्यात आलेले असल्यामुळे तो द्विधामनस्थितीत असावा आणि त्याच विचारात तो हूक करण्याच्या प्रयत्नात बाद झाला. तो त्याचा नैसर्गिक फटका नव्हता. चार हजारांहून अधिक धावा करणाऱ्या फलंदाजाला जर पवित्रा बदलण्यास सांगण्यात आले तर असेच घडत असते. खेळपट्टीवर जास्तीत जास्त वेळ उभे राहणे हा पुजाराचा खेळ आहे. दुसऱ्या सत्रापर्यंत कोहली-रहाणे यांची जोडी जमली. भारताने 300 पेक्षा अधिक धावा केल्याने आता  इंग्लंडला बॅटफूटवर टाकता येईल. 
 

संबंधित बातम्या