कसोटी क्रिकेटमधील शतकाचा पुजाराने घालून दिला वस्तुपाठ : गावसकर

वृत्तसंस्था
Sunday, 2 September 2018

चेतेश्‍वर पुजाराच्या इंग्लंडमधील पहिल्यावहिल्या संयमी आणि झुंजार शतकाच्या जोरावर भारताला इंग्लंडवर माफक वर्चस्व मिळवता आले. क्रिजवर जास्तीत जास्त वेळ उभे राहण्याचा निर्धार असणाऱ्या पुजाराचे हे कसोटी क्रिकेटचे परिपूर्ण शतक होते. मर्यादित षटकांच्या खेळात उंच टोलेबाजी करण्याची सवय जडलेल्या आधुनिक फलंदाजांच्या तुलनेत पुजाराचे हे शतक वेगळे होते.

मर्यादित षटकांच्या खेळात टोलेबाजी करणारे फलंदाज कसोटीत लाल रंगाचा चेंडू अधिक प्रमाणात करामत दाखवत असतो हे लक्षात घेत नाहीत. त्यामुळे ते बाद होतात; परंतु पुजाराने जम बसवण्यासाठी वेळ घेतला. सुरवातीचा कठीण काळ त्याने जाऊ दिला. त्यानंतर शानदार शतक साजरे केले. एवढेच नव्हे तर त्याने ईशांत शर्मा आणि जसप्रीत बुमरा यांच्याकडूनही साथ मिळविली. या अखेरच्या फलंदाजांकडून साथ मिळविताना त्याने स्वतःचे शतक तर केलेच; त्याचबरोबर संघाला आघाडीही मिळवून दिली. 

पहिल्या दोन दिवसांत मिळून 20 फलंदाज बाद झाले. यावरून खेळपट्टीत जान आहे. चेंडूही चांगल्या प्रमाणात स्विंग होत आहे. अशा परिस्थितीत तंत्रात चूक झाल्यास फलंदाज विकेट गमावत आहे. त्यातच मोईन अली या फिरकी गोलंदाजाने पाच विकेट मिळविल्यामुळे भारताची चिंता वाढली आहे. खरे तर खेळपट्टी फिरकीस अजिबात साथ देत नव्हती. ईशांत शर्माच्या फॉलोथ्रूमुळे तयार झालेल्या रफचा मोईने फायदा घेतला आणि त्यामध्ये पडलेले चेंडू मधूनच वळत होते. फलंदाजांच्या मनात त्यामुळे संभ्रम निर्माण होत होता. परिणामी, द्विधा मनःस्थितीत भारतीय फलंदाजांनी त्याला विकेट दिल्या. अखेरच्या डावात 150 ते 200 धावांचा पाठलाग सोपा नसेल याची जाणीव भारतीयांना असेल. 

बुमराहमुळे भारताचा वेगवान मारा प्रभावी ठरत आहे. वेगाबरोबर त्याचे स्विंग होणारे चेंडू फलंदाजांसाठी धोकादायक ठरत आहेत. पहिल्या दोन सामन्यांत ईशांत शर्मा जेवढा धोकादायक ठरला तेवढा तो आता वाटत नाही. महम्मद शमीचाही मारा तिखट वाटत आहे; परंतु त्याला दैवाची साथ मिळत नाही. बॅटच्या बाहेरून त्याचे चेंडू जात आहेत. तरीही नाणेफेक गमावल्यावरही भारताला पकड मिळविण्याची आणि मालिकेत बरोबरी साधण्याची संधी मिळाली आहे. 

​ ​

संबंधित बातम्या