अष्टपैलुत्वाच्या क्षमतेची केदार जाधवकडून चुणूक 

सुनील गावसकर
Friday, 21 September 2018

केदार जाधवने अष्टपैलूची भूमिका बजावण्याची क्षमता असल्याचे दाखवून दिले. हॉंगकॉंग तसेच पाकविरुद्धच्या लढतीतून हेच दिसून आले. प्रतिस्पर्धी कमकुवत असतील किंवा तो टाकतो त्या चेंडूंचे वेगवेगळे टप्पे असतील; तो आपल्या संघासाठी खणखणीत कामगिरी बजावतो हे नक्की. प्रमुख गोलंदाज झगडत असतील तर केदारमुळे कर्णधारासमोर अतिरिक्त पर्याय असतो. 

आशिया करंडक राखण्याच्या मोहिमेत पाकिस्तानवरील सफाईदार विजयामुळे भारतीय संघाचा आत्मविश्‍वास बराच उंचावलेला असेल. हॉंगकॉंगसारख्या सहसदस्य प्रतिस्पर्ध्याविरुद्ध भारताला पूर्ण शंभर षटके मैदानावर झुंजावे लागले. अशावेळी पाकिस्तानविरुद्धच्या लढतीत खेळाच्या सर्व क्षेत्रांतील चौकोनांत "बरोबर'च्या खुणा झाल्या. हार्दिक पंड्याची दुखापत हाच एकमेव चिंतेचा मुद्दा ठरेल. 

केदार जाधवने अष्टपैलूची भूमिका बजावण्याची क्षमता असल्याचे दाखवून दिले. हॉंगकॉंग तसेच पाकविरुद्धच्या लढतीतून हेच दिसून आले. प्रतिस्पर्धी कमकुवत असतील किंवा तो टाकतो त्या चेंडूंचे वेगवेगळे टप्पे असतील; तो आपल्या संघासाठी खणखणीत कामगिरी बजावतो हे नक्की. प्रमुख गोलंदाज झगडत असतील तर केदारमुळे कर्णधारासमोर अतिरिक्त पर्याय असतो. 

धवन आणि रोहित यांना पुन्हा फॉर्म गवसल्यामुळे भारतीय संघाला बराच आनंद झाला असेल. मोठी धावसंख्या असेल तर वेगवान सलामीमुळे वाटचाल सुकर होते. रायुडू चांगल्या फॉर्मात दिसतो आहे. त्याच्या थेट थ्रोमुळे शोएब मलिक धावचीत झाला. परिणामी पाकिस्तानला अंतिम टप्प्यात धावगती वाढविता आली नाही. मागील साधारण वर्षभरात भारतीय गोलंदाजी केंद्रस्थानी राहिली आहे. कोणत्याही परिस्थितीत विकेट घेण्याची क्षमता गोलंदाजांनी प्रदर्शित केली आहे. वाळवंटातील उष्णतेतसुद्धा त्यांचे प्रयत्न दाद देण्याजोगे आहेत. 

भारत विरुद्ध पाकिस्तान लढतीचा बराच गवगवा होतो. अशावेळी बांगलादेश व अफगाणिस्तान अशा प्रतिस्पर्धींना कमी लेखले जाण्याचा धोका असतो. हॉंगकॉंगचा प्रतिकार पाहता भारत अशी चूक नक्कीच करणार नाही. उरलेला प्रत्येक सामना पाकविरुद्धच्या लढतीप्रमाणे सहज जिंकण्याचा भारताचा प्रयत्न राहील. 

श्रीलंकेला हरवीत बांगलादेश आणि अफगाणिस्तान यांनी वन-डे क्रिकेटमध्ये आपण किती चांगली मजल मारली आहे हे दाखवून दिले. अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करून 250च्या आसपास धावसंख्या उभारली तर येथील संथ खेळपट्ट्यांवर त्यांचे फिरकी गोलंदाज कोंडी करू शकतात. बांगलादेश संघाच्या निष्ठेसाठी तमिम इक्‍बाल याचे उदाहरण घेता येईल. हात मोडला असूनही तो पुन्हा उतरला आणि एका हाताने खेळला. छोट्या चणीचा मुशफीकउर उत्तरोत्तर ताकदवान कामगिरी करतो आहे. 
बांगलादेशच्या गोलंदाजांकडे माफक धावसंख्येचेही रक्षण करण्याची क्षमता आहे. 
भारतीय संघ भरात आला असला आणि पाकिस्तानवरील अविस्मरणीय विजय मिळाला असला तरी महत्त्वाचा टप्पा यानंतर आहे. त्यामुळे "पिक्‍चर अभी बाकी है' हे विसरून चालणार नाही.

संबंधित बातम्या