विराटमधली अपरिपक्वता स्पष्ट दिसतेय : गावसकर

वृत्तसंस्था
Thursday, 13 September 2018

विराटला अजून बरंच काही शिकायचे आहे. दक्षिण आफ्रिकेपाठोपाठ आता इंग्लंडमध्येही दिसले. क्षेत्ररक्षणामध्ये करावा लागणार बदल, गोलंदाजीतील बदल यामध्ये किती बदल आवश्यक आहे हे दिसून आले. त्याने कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारून दोनच वर्षे झाली आहेत.

लंडन : आगोदर दक्षिण आफ्रिका आणि आता इंग्लंडकडून पराभव स्वीकारावा लागल्यानंतर कर्णधार विराट कोहलीला अजून बरंच काही शिकायचे आहे असे दिसते. त्याचा कर्णधारपदातील अपरिपक्वपणा स्पष्ट दिसतोय, अशी खरमरीत टीका सुनील गावसकर यांनी केली.

इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत भारताला इंग्लंडकडून 4-1 असा दारुण पराभव स्वीकारावा लागला. विराट कोहली वगळता एकही भारतीय खेळाडूला चमकदार कामगिरी करता आली नाही. दक्षिण आफ्रिकेनंतर भारताला इंग्लंडमध्ये मालिका गमवावी लागली आहे. भारतीय संघाच्या कामगिरीवर जोरदार टीका होत असताना माजी क्रिकेटपटूंनीही संघाच्या कामगिरीबद्दल खेळाडूंना लक्ष्य केले आहे. सुनील गावसकर यांनी तर थेट कोहलीच्या कर्णधारपदाच्या कामगिरीवरच आक्षेप नोंदविला आहे.

गावसकर म्हणाले, ''विराटला अजून बरंच काही शिकायचे आहे. दक्षिण आफ्रिकेपाठोपाठ आता इंग्लंडमध्येही दिसले. क्षेत्ररक्षणामध्ये करावा लागणार बदल, गोलंदाजीतील बदल यामध्ये किती बदल आवश्यक आहे हे दिसून आले. त्याने कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारून दोनच वर्षे झाली आहेत. त्याला अजून बराच अनुभव घ्यायचा आहे. मायदेशात खेळताना येणाऱ्या अनुभवाचा त्याने आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी करावा. त्याने ती लय कायम ठेवावी. संघात मोठे बदल आवश्यक आहेत. संघातील कच्चे दुवे शोधून त्यावर काम केले पाहिजे.''

संबंधित बातम्या