कसोटीत वीरुसारखं चमकण्यासाठी गावसकरांचा रोहितला मोठा सल्ला

वृत्तसंस्था
Saturday, 21 September 2019

आपल्याला माहित आहे की पांढरा चेंडू केवळ चार- पाच षटकांमध्ये स्विंग व्हायचा बंद होतो. मात्र, लाल चेंडू 35-40 षटकांनंतरही स्विंग होतो. रोहितला नेमका स्विंग होणारा चेंडू खेळण्यात अडचणी येतात हे आपण पाहिलं आहे. मात्र, त्याची शॉटची निवड चांगली आहे त्यामुळेच तो कसोटीतही चांगल्या धावा करेल

नवी दिल्ली : कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय संघात लोकेश राहुलचे अपयश आणि पृथ्वी शॉची आधी दुखापत आणि आता बंदी यामुळे सलामीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. अखेर मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये सर्वोत्तम सलामीवीरांपैकी एक असलेल्या रोहित शर्माला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सलामीला खेळण्याची संधी देण्यात आली. आता त्याची आक्रमक फलंदाजी पाहता तोही कसोटी क्रिकेटमध्ये वीरेंद्र सेहवागसारखी कामगिरी करणार अशी चर्चा सुरु आहे. भारताचे माजी कर्णधार सुनील गावसरांनीसुद्धा त्याला वीरुसारखं खेळण्यासाठी टीप्स दिल्या आहेत. 

आता मी कसोटी क्रिकेट खेळणार नाही; क्रिकेटपटूचा धक्कादायक निर्णय

सलामीवीरासाठी खास तंत्र असते ते अचुकही असायला लागते. या तंत्रापासून सेहवाग दूर होता पण धावांच्या बाबतीत तो सरस होता. दोन त्रिशतके त्याने सलामीवीर म्हणूनच झळकावलेली आहेत. आता रोहित शर्माला कसोटीतील सेहवाग होण्याची संधी बहुतेक मिळणार आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी केएल राहुलला वगळण्यात आले आणि गेल्या काही दिवसांपासून रोहीतला सलामीला खेळवा या मागणीने जोर धरला. दस्तुरखुद्द सौरव गांगुलीनेही सलामीला रोहितचा पर्याय सुचवलेला होता.

''आपल्याला माहित आहे की पांढरा चेंडू केवळ चार- पाच षटकांमध्ये स्विंग व्हायचा बंद होतो. मात्र, लाल चेंडू 35-40 षटकांनंतरही स्विंग होतो. रोहितला नेमका स्विंग होणारा चेंडू खेळण्यात अडचणी येतात हे आपण पाहिलं आहे. मात्र, त्याची शॉटची निवड चांगली आहे त्यामुळेच तो कसोटीतही चांगल्या धावा करेल,'' असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. 

ICC कडून मोठी चूक; केला राहुल द्रविडचा अपमान

वीरुसारखी स्फोटक फलंदाजी करायची असेल तर त्याने करावे हेही त्यांनी सांगितले. ते म्हणाले, ''रोहितकडे वीरुसारखा चांगला डिफेन्स नाहीये मात्र, त्याच्याकडे सेहवागपेक्षा जास्त शॉट्स आहेत. सेहवागला ऑन साईडला चेंडू मारता यायचा नाही मात्र, रोहित सहजरित्या चेंडू पूल किंवा हूक करु शकतो. त्याने जर त्याच्या डिफेन्सवर थोडं काम केलं तर तो नक्कीच कसोटीमध्ये सेहवागसारखा यशस्वी होईल.''

 


​ ​

संबंधित बातम्या