भारताच्या डेव्हिस चषक संघाच्या व्यवस्थापकपदी सुंदर अय्यर यांची  नियुक्ती    

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 27 February 2020

भारताच्या क्रोएशिया  विरुद्ध होणाऱ्या डेव्हिस चषक लढतीसाठी अखिल भारतीय टेनिस संघटना(एआयटीए) यांच्या वतीने पुण्यातील टेनिस संघटक सुंदर अय्यर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.  हि लढत क्रोएशिया येथे झाग्रेब येथे 6 व 7 मार्च रोजी होणार आहे. 

पुणे :  भारताच्या क्रोएशिया  विरुद्ध होणाऱ्या डेव्हिस चषक लढतीसाठी अखिल भारतीय टेनिस संघटना(एआयटीए) यांच्या वतीने पुण्यातील टेनिस संघटक सुंदर अय्यर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.  हि लढत क्रोएशिया येथे झाग्रेब येथे 6 व 7 मार्च रोजी होणार आहे. 

महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटनेचे मानद सचिव सुंदर अय्यर यांची सलग दुसऱ्यांदा भारतीय संघ व्यवस्थापकपदी निवड करण्यात आली आहे. यापूर्वी गेल्यावर्षी नोव्हेंबर मध्ये पाकिस्तान विरुद्ध झालेल्या लढतीसाठी ते संघाचे व्यवस्थापक होते. हि लढत कझाकस्तानमध्ये नुरसुलतान येथे झाली होती. 

एआयटीएचे आजीव अध्यक्ष अनिल खन्ना, मानद सचिव हिरन्मय चॅटर्जी, संघाचे कर्णधार रोहित राजपाल आणि डेव्हिस चषक संघातील सदस्यांनी माझ्यावर दाखविलेल्या विश्वासामुळे मला पुन्हा एकदा भारतीय संघाचा एक भाग होण्याची संधी मिळाली, माझ्यासाठी हि अभिमानाची गोष्ट आहे. मला सहकार्य करणाऱ्या सर्वांचे मी आभार मानतो, असे सुंदर अय्यर यांनी सांगितले. 

भारतीय संघात रोहित राजपाल(कर्णधार), झीशान अली(प्रशिक्षक), प्रजनेश गुनणेश्वरन, सुमित नागल, रामकुमार रामनाथन, लिएंडर पेस, रोहन बोपन्ना, दिवीज शरण यांचा समावेश आहे. 


​ ​

संबंधित बातम्या