कोरोनानंतरच्या टेनिस स्पर्धेत भारताचा सुमीत नागल विजेता

टीम ई-सकाळ
Wednesday, 1 July 2020

नागल या अगोदरचे स्पर्धात्मक टेनिस मार्च महिन्यात खेळला होता. डेव्हिस करडंक स्पर्धेत त्याचा सामना क्रोएशियाच्या मारिन सिलिकविरुद्ध झाला होता.

बर्लिन : टेनिसमधील अव्वल खेळाडू नोवाक जोकोविचची प्रदर्शनीय स्पर्धा कोरोनाबाधित झाल्यामुळे वादात सापडली; परंतु कोरोनाचे भय असतानाही जर्मनीत एक स्थानिक स्पर्धा झाली आणि त्यात भारताच्या सुमीत नागलने विजेतेपद मिळवले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या पहिल्यावहिल्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत विजेतेपद मिळवण्याचा मान सुमीतने मिळवला. पीएसडी बँक नॉर्ड ओपन ही स्पर्धा क्ले कोर्टवर झाली.नागल हा भारताचा  सध्याच्या घडीचा प्रमुख टेनिसपटू आहे. जागतिक क्रमवारीत त्याचे 127  वे मानांकन आहे. अंतिम सामन्यात त्याने जर्मनीच्या डॅनियल मासूरचा 6-1, 6-3 असा पराभव केला.

'धमक असणारा गोलंदाज लाळेशिवाय आमचा चेंडू स्विंग करु शकेल'

ही स्पर्धा पीनबर्ग टेनिस क्लबवर झाली. हा क्लब सुमीत जर्मनीत घर असलेल्या पेनी येथून दोन तासांवर आहे. चार महिन्यानंतर पुन्हा कोर्टवर आल्याचा आनंद अवर्णनीय आहे. ही स्पर्धा फार मोठी नव्हती. 60 पेक्षा कमी खेळाडू होते आणि मी सराव करत असलेल्या नेसेल अकादमीपासूनही दूर नव्हती. त्यामुळे या स्पर्धेत खेळण्याचा मी निर्णय घेतला, असे नागलने सांगितले. नागल या अगोदरचे स्पर्धात्मक टेनिस मार्च महिन्यात खेळला होता. डेव्हिस करडंक स्पर्धेत त्याचा सामना क्रोएशियाच्या मारिन सिलिकविरुद्ध झाला होता.

भारतीय संघाच्या नेतृत्वासाठी रोहित शर्मा रेडीमेड ऑप्शन​

कशी झाली स्पर्धा

या अगोदर मी खेळलेल्या अनेक स्पर्धांच्या तुलनेत जर्मनीतील या स्पर्धेचा अनुभव फारच वेगळा होता. प्रत्येक खेळाडूचे टेंपरेचर तपासले जायचे, कोर्टवर जाण्यापूर्वी हात निर्जंतुक करायला लागायचे. एका वेळी कोर्टवर मोजकेच खेळाडू आणि काही प्रेक्षक असायचे; पण सर्वांमध्ये अंतर ठेवणे अनिवार्य होते. किमान दोन मीटरची मर्यादा ठेवायला लागायची. सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वतःला या निर्बंधांनी सातत्याने जाणीव करून द्यायला लागायची, अशी स्पर्धेबाबतची माहिती नागलने दिली.


​ ​

संबंधित बातम्या