हॉकी अंतिम लढतीपूर्वी भारत-ब्रिटन बरोबरी

वृत्तसंस्था
Saturday, 19 October 2019

- भारत आणि ब्रिटन यांच्यात सुलतान ऑफ जोहोर कप हॉकी स्पर्धेतील विजेतेपदाची लढत होणार आहे. त्यापूर्वीची प्रतिस्पर्धी संघातील अखेरची साखळी लढत 3-3 बरोबरीत सुटली.

- पहिल्या तीन सत्रांत एकही गोल न केलेल्या भारताने चौथ्या सत्रात नऊ मिनिटांत तीन गोल करीत 3-2 अशी आघाडी घेतली; पण अखेर बरोबरीचा गोल स्वीकारला.

जोहोर बारु (मलेशिया) -  भारत आणि ब्रिटन यांच्यात सुलतान ऑफ जोहोर कप हॉकी स्पर्धेतील विजेतेपदाची लढत होणार आहे. त्यापूर्वीची प्रतिस्पर्धी संघातील अखेरची साखळी लढत 3-3 बरोबरीत सुटली. 
पहिल्या सत्रात वर्चस्व राखूनही गोल करण्यात अपयशी ठरलेल्या भारतास दुसऱ्या सत्रात पाच मिनिटांत दोन गोल स्वीकारावे लागले. पहिल्या तीन सत्रांत एकही गोल न केलेल्या भारताने चौथ्या सत्रात नऊ मिनिटांत तीन गोल करीत 3-2 अशी आघाडी घेतली; पण अखेर बरोबरीचा गोल स्वीकारला. भारताकडून शीलानंद लाक्रा, मनदीप मोर आणि शारदा नंद तिवारी यांनी प्रत्येकी एक गोल केला. 
दरम्यान, भारत या स्पर्धेची अंतिम फेरी सहाव्यांदा खेळणार आहे; पण त्यांनी यापूर्वी दोनदाच विजेतेपद पटकावले आहे. त्याचबरोबर भारतीय संघास गतवर्षीच्या अंतिम फेरीतील पराभवाचे उट्टे काढण्याचीही संधी आहे. 
---- 
आम्ही अखेरच्या साखळी लढतीत अनेक संधी दवडल्या. ही चूक अंतिम सामन्यात नक्कीच परवडणार नाही. अर्थात सलग दोन सामने खेळताना दुसऱ्या दिवशी आमचा खेळ उंचावतो. अंतिम सामन्यात सातत्य आणि चुका टाळणे हे महत्त्वाचे असेल. ब्रिटनच्या कडव्या आव्हानास सामोरे जाण्यास तयार आहोत. 
- बी. जे. कनप्पा, भारतीय मार्गदर्शक  


​ ​

संबंधित बातम्या